शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्या : सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 17:30 IST

सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने येथील खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे हॉस्पिटल्स या कामी नकार देतील अशी हॉस्पिटल्स प्रशासनाने ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

ठळक मुद्दे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्या :सौरभ रावकोविड हॉस्पीटलची आयुक्तांनी केली पहाणी

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने येथील खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे हॉस्पिटल्स या कामी नकार देतील अशी हॉस्पिटल्स प्रशासनाने ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.पुढे ते म्हणाले, कोरोनाच्या उपाय योजना संदर्भात निधीची कमतरता पडणार नाही. आवश्यक तो निधी प्रशासनाकडे लवकरच सुपुर्द करण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुल येथे 110 तर शासकीय महाविद्यालय मिरज येथे 50 बेड्सचे डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल उभारणीचे काम सुरू असून लवकरच ते कार्यान्वित होईल. ते कार्यान्वित झाल्यानंतर येथील रूग्णांची मोठी सोय होईल.

जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आढावा घेण्यासाठी विविध हॉस्पीटल्स मॅनेजमेंटशी झुम ॲपव्दारे संवाद साधावा. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी हॉस्पिटल चालविण्याचा अनुभव असणाऱ्या खाजगी तसेच निवृत्त डॉक्टरांची सेवा घ्यावी. त्याचबरोबर रूग्णालयातील उपलब्ध असणाऱ्या बेड मॅनेजमेंटचाही आढावा दररोज घेण्यात यावा, अशी सूचना करून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील कोरोनाविषयक स्थितीची व करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली, ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील 50 वर्षापुढील कोमॉर्बिडिटी असलेल्या व्यक्तींची ॲन्टीजन टेस्ट करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील बाधित रूग्णांपैकी 60 टक्के रूग्ण बरे झाले आहेत तर 36 टक्के रूग्ण सध्या उपचाराधिन असल्याचे सांगून जिल्हा प्रशासनाकडे लवकरच 30 व्हेंटीलेटर उपलब्ध होणार असल्याचीही माहिती श्री. चौधरी यांनी याप्रसंगी दिली. या बैठकीनंतर आयुक्तांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे उभारण्यात येणाऱ्या 110 बेडच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलची पहाणी केली.या आढावा बैठकीसाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी विजया यादव तसेच सर्वश्री विवेक आगवणे, बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार केंबळे आदि उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्त