शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सांगली जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक नवे रुग्ण; महापालिका क्षेत्रात सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 19:21 IST

सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा कहर वाढत असतानाच, रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद झाली. यात महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे, तर सांगली शहरातील नळभाग आणि कृष्णाघाट परिसर येथील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात रेकॉर्डब्रेक नवे रुग्णमहापालिका क्षेत्रात सर्वाधिक

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर वाढत असतानाच, रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद झाली. यात महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे, तर सांगली शहरातील नळभाग आणि कृष्णाघाट परिसर येथील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक ३४ नवे रुग्ण आढळले आहेत, तर दिवसभरात ८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधितांची गुरुवारी नोंद झाली. सांगलीतील नळभाग येथील ६८ वर्षीय वृध्दावर वॉन्लेस रुग्णालयात, तर कृष्णाघाट (सांगली) येथील ५९ वर्षीय व्यक्तीवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या ७२ झाली आहे.

महापालिका क्षेत्रात १३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात सांगलीतील ६४, तर मिरजेतील ७० जणांचा समावेश आहे. यात वारणाली, विश्रामबाग, माधवनगर रोड, लाले प्लॉट, एसटी कॉलनी, विश्रामबाग, हनुमाननगर, मंगलमूर्ती कॉलनी, जवाहर चौक, वानलेसवाडी, खणभाग, कुंभारखण, गणेशनगर, मंगळवार पेठ, गंगानगर, शामरावनगर येथील रूग्णांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात १८१ अ‍ॅँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यातील १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.मिरज तालुक्यात सर्वाधिक ३४ रूग्ण आढळून आले. सलगरे, कवठेपिरान, आरग या मोठ्या गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यात भोसे येथे ९, बेडग ५, अंकली ७, आरगमध्ये ३, सलगरे, मौजे डिग्रजमध्ये प्रत्येकी दोन, गुंडेवाडी, कवठेपिरान, दुधगाव, वड्डी, कर्नाळ, हरिपूर येथे प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.पलूस तालुक्यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात खटाव येथील ६, सावंतपूर येथील ५, वसगडे, सुखवाडीत प्रत्येकी तीन, माळवाडीत दोन, तर अंंकलखोप येथील एकाचा समावेश आहे.जत तालुक्यात १६ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. यात जत येथील ११, बिळूर २, अंकलगी, उमराणी, पाच्छापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तासगाव तालुक्यात वंजारवाडी येथील १० आणि तासगाव शहरातील दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे. वाळवा तालुक्यात इस्लामपूर शहरात ३, ताकारी, आष्टा, शिगाव येथे प्रत्येकी २, तर भडकंबे, कोरेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली