शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : मिरजेत तब्बल ५ हजार लिटर शिरखुर्मा, गरीब मुस्लिम कुटुंबांसाठी ईदचीभेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 16:17 IST

पवित्र रमजान ईदच्या आनंदापासून वंचित राहिलेल्या मुस्लिम बांधवांसाठी मिरजेतील हयात फाऊंडेशनने तब्बल ५ हजार लिटरचा शिरखुर्मा तयार केला. शहरातील चार हजार कुटूंबांना घरोघरी पोहोच केला. कोरोनाची महामारी अणि लॉकडाऊनच्या संकटात दोनवेळच्या जेवणालाही महाग झालेल्या मुस्लिम कुटुंबांसाठी ईदची ही अनोखी भेट ठरली.

ठळक मुद्देमिरजेत तब्बल ५ हजार लिटर शिरखुर्मासाडेतीन हजार लिटर दूध, ५०० किलो साखर, ८० किलो तुपाचा वापर

सांगली : पवित्र रमजान ईदच्या आनंदापासून वंचित राहिलेल्या मुस्लिम बांधवांसाठी मिरजेतील हयात फाऊंडेशनने तब्बल ५ हजार लिटरचा शिरखुर्मा तयार केला. शहरातील चार हजार कुटूंबांना घरोघरी पोहोच केला. कोरोनाची महामारी अणि लॉकडाऊनच्या संकटात दोनवेळच्या जेवणालाही महाग झालेल्या मुस्लिम कुटुंबांसाठी ईदची ही अनोखी भेट ठरली.शकिल पिरजादे अणि त्यांच्या सहकार्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला. लॉकडाऊन काळात जेवणाची भ्रांत असणार्या कुटुंबांचे त्यांनी सर्वेक्षण केले. अशी गरीब व गरजू ३ हजार ७८५ कुटुंबे निघाली. त्यांच्यासाठी गेल्या ६३ दिवसांपासून दररोज जेवणाचा घरोघरी जाऊन पुरवठा केला जात आहे.

आजवर ११ हजार ८०० किलो तांदूळ बिर्याणीसाठी वापरला गेला. रमजान ईदचा सणही लॉकडाऊन काळातच आल्याने या कुटुंबांसाठीशिरखुर्मा तयार करण्याचा संकल्प फाऊंडेशनने केला. त्यासाठी लागणारे साहित्यही तितकेच अवाढव्य असे होते. साडेतीन हजार लिटर दूध, ५०० किलो साखर, ८० किलो तूप, १२५ किलो सुकामेवा, १५० किलो शेवया अशी सामग्री वापरली गेली.

शास्त्री चौकातील फातीमा मस्जिदीच्या प्रांगणात रात्रभर कार्यकर्त्यांनी खीर शिजविली. पहाटे पाचचा नमाज होईपर्यंत ती तयारही झाली. सकाळी डबे भरण्याचे काम सुरु झाले. अकरा-बारापर्यंत हजारभर घरांत ती पोहोचलीदेखील. प्रत्येक घरात दोन डबे देण्यात आले. या उपक्रमात पिरजादे यांच्यासह अमीन जातकार, शमशुद्दीन शेख, नईम सलाती आदींनी भाग घेतला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRamadanरमजानmiraj-acमिरजSangliसांगली