शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सांगलीत नॉन कोविड रुग्णांचे उपचाराअभावी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 13:58 IST

सांगली जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गेल्या दोन महिन्यांपासून नॉन कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या भीतीने काही खासगी रुग्णालये बंद आहेत, तर काहींनी केवळ ओपीडीच सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह सांगली-मिरज शासकीय रुग्णालयावर नॉन कोविड रुग्णांचा ताण वाढला आहे.

ठळक मुद्देसांगलीत नॉन कोविड रुग्णांचे उपचाराअभावी हाल, खासगी रुग्णालयात नकार कोरोना चाचणीची सक्ती; सिव्हिल, मनपा रुग्णालयांवर ताण वाढला

शीतल पाटील सांगली : जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गेल्या दोन महिन्यांपासून नॉन कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या भीतीने काही खासगी रुग्णालये बंद आहेत, तर काहींनी केवळ ओपीडीच सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह सांगली-मिरज शासकीय रुग्णालयावर नॉन कोविड रुग्णांचा ताण वाढला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होताच अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार थांबविले. केवळ दूरध्वनीवरून रुग्णांना सल्ला दिला जात होता. संसर्ग आणखी वाढताच काही रुग्णालयांनी ओपीडीही बंद केली. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांवरील उपचाराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. ताप, सर्दी, खोकला असेल, तर बहुतांश रुग्णालयांनी उपचारास नकार दिल्याचा अनुभवही अनेक रुग्णांना आला आहे.

१० ते १५ वर्षे एकाच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवरही उपचारासाठी भटकंतीची वेळ आली आहे. चार तास थांबून, हजारो रुपये खर्चून उपचार घेणाऱ्या या रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार मिळालेले नाहीत. त्यातूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत रुग्णालयांनीच उपचारासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू केला, तर आंतररुग्ण विभागात दाखल होण्यासाठी कोविड चाचणीची सक्ती केली जात आहे. त्यासाठी या रुग्णांना पुन्हा महापालिकेची आरोग्य केंद्रे, खासगी लॅबमध्ये चाचणी करून घ्यावी लागते. यात बराच वेळ निघून जातो. त्यामुळे रुग्ण चिंताजनक स्थितीत पोहोचतो.अशा नॉन कोविड रुग्णांना सांगली-मिरज सिव्हिल, महापालिकेच्या आरोग्य केंद्रांनी मात्र मोठा आधार दिला आहे. सांगली-मिरज सिव्हिलमधील ओपीडीत दररोज २ ते ३ हजार रुग्ण येतात. जिल्हाबंदीमुळे ओपीडीतील रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, आंतररुग्ण विभागातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात खाटांच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाले आहेत. एकट्या स्त्रीरोग विभागात पाचशे ते साडेपाचशे रुग्ण आहेत. याशिवाय हृदयविकार, पोटाच्या विकाराचे रुग्णही मोठ्या संख्येने आहेत. महापालिकेच्या पंचमुखी मारुती रस्त्यावरील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दररोजची ओपीडी १०० ते १२५ ची होती. आता कोरोनाच्या काळात त्यात २५० पर्यंत वाढ झाली आहे. यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले अनेक रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयावरील ताण वाढला आहे.

नॉन कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी उपचारास नकार दिल्याने शासकीय रुग्णालयावरील ताण वाढला आहे. वास्तविक खासगी रुग्णालयांनी कोविड अथवा नॉन कोविड रुग्णांवर आवश्यक ती खबरदारी घेऊन उपचार करण्याची गरज आहे. पण ही रुग्णालये उपचारासाठी टाळाटाळ करीत आहेत. शासकीय रुग्णालयांना क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली. खासगी रुग्णालयांनी थोडेफार सहकार्य केले तरी नॉन कोविड रुग्णांचे हाल होणार नाहीत.- डॉ. नंदकुमार गायकवाड,वैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल रुग्णालय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलSangliसांगली