शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -संसर्ग टाळण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात कामगारांची वारंवार तपासणी करा :चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:08 IST

कोेरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या उद्योजकांनी शक्य असेल तेथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवावी, 50, 55 वर्षावरील कामगारांना शक्यतो सुट्टी द्यावी, शक्य त्या ठिकाणी घरातूनच काम करावे, , अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

ठळक मुद्देसंसर्ग टाळण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात कामगारांची वारंवार तपासणी करा :चौधरीकामगारांची संख्या कमी ठेवा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोेरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या उद्योजकांनी शक्य असेल तेथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवावी, 50, 55 वर्षावरील कामगारांना शक्यतो सुट्टी द्यावी, शक्य त्या ठिकाणी घरातूनच काम करावे, , अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

कामगारांची येताना व जाताना तपासणी करून कोणालाही काही त्रास आहे का ते पहावे व कोणालाही काही त्रास असल्यास त्यांना कामाच्या ठिकाणी येऊ न देता त्यांना वैद्यकीय उपचार द्यावेत. जर कोणी परदेश वारी करून करून आले असेल व त्यांना काही लक्षणे असो किंवा नसो तरीही त्यांची माहिती तात्काळ द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिल्या.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, औद्योगिक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.एमआयडीसीमध्ये असणाऱ्या मशनरीची वारंवार स्वच्छता ठेवावी. विशेषत: ज्या ठिकाणी कामगारांचा स्पर्श होतो त्याची वारंवार स्वच्छता करणे आवश्यक आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोणीही घाबरून जावू नये, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कामगारांना वारंवार हात स्वच्छ धुण्याच्या व वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याचा सुचना द्याव्यात.

गर्दी टाळण्यासाठी मिटींग, ट्रेनिंग, सेमिनार, कॉन्फरन्स घेऊ नयेत. कॅन्टीनमधील स्टाफही एकाच शिफ्टमध्ये न ठेवता दोन वेगळ्या शिफ्टमध्ये करून त्यांची संख्या कमी करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजनांबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, एमआयडीसी क्षेत्रातील कामगारांची नेहमी तपासणी करावी यासाठी फिल्ड मॅनेंजरची नियुक्ती करावी व कोणाला काही त्रास असल्यास त्याबाबतची माहिती द्यावी. गर्दी टाळण्यासाठी शिफ्टमध्ये काम करावे. स्टील मशनरीची स्वच्छता ठेवावी. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेबाबत स्वत: शिस्त लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कामगार व त्यांचा परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी उद्योजकांनी एमआयडीसी क्षेत्रात आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत व स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली