शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सांगलीत कोविड रॅपिड टेस्टला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 17:10 IST

कोरोनाचा वाढता कहर आणि रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत असल्याने, लवकर उपचार सुरू करण्यासाठी, कोरोनाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. यासाठी सांगलीत आता अ‍ॅन्टीजेन कीटच्या माध्यमातून जलद तपासणीला सुरूवात झाली असून सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. पहिल्या टप्प्यात ९७५ कीट उपलब्ध झाले असून कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कोविड योध्दे आणि रूग्णालयातील इतर रूग्णांच्या तपासणीसाठी या कीटचा वापर केला जाणार आहे.

ठळक मुद्देसांगलीत कोविड रॅपिड टेस्टला सुरुवातकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण; शासकीय रुग्णालयात होणार वापर

सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत असल्याने, लवकर उपचार सुरू करण्यासाठी, कोरोनाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. यासाठी सांगलीत आता अ‍ॅन्टीजेन कीटच्या माध्यमातून जलद तपासणीला सुरूवात झाली असून सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. पहिल्या टप्प्यात ९७५ कीट उपलब्ध झाले असून कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कोविड योध्दे आणि रूग्णालयातील इतर रूग्णांच्या तपासणीसाठी या कीटचा वापर केला जाणार आहे.गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अधिक वाढ होत आहे. या आठवड्यात तर मोठ्या संख्येने रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला वेळेत निदान होण्याबरोबरच त्वरित उपचार होण्यासाठी रॅपिड टेस्टसाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू होता. राज्यातील मोठ्या शहरांत या जलद चाचण्यांमुळे रूग्णांवर वेळेत उपचार शक्य झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पाठपुरावा करत, परवानगीसाठी प्रयत्न सुरू केले होते.स्थानिक पातळीवरील निधीतून कीटची उपलब्धता झाली तरी, त्यांच्या वापराबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज होती. त्यानुसार प्रशासनाने पहिल्या टप्प्यात सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात या अ‍ॅन्टीजेन कीटचा वापर करण्याचे नियोजन केले होते. कीटची उपलब्धता झाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर २५ तपासण्या करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना कीटच्या वापराचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यामुळे आता चाचण्यांची संख्या वाढणार आहे.प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार मिरजेत कोविड रुग्णांवर उपचार, तर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात नॉन कोविड रूग्णांवर उपचार होणार आहेत. तरीही वाढत्या संसर्गाचा विचार करता, रूग्णांच्या तपासणीसाठी याचा वापर होणार आहे.पहिल्या टप्प्यात ९७५ अ‍ॅन्टीजेन कीटची उपलब्धता झाली आहे. याचा वापर करताना कोरोनाची लक्षणे असलेल्या रूग्णांबरोबरच कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी त्याचा वापर होणार आहे. लवकरच चार हजारहून अधिक कीट उपलब्ध केले जाणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली