शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात बेडसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:39 IST

सांगली जिल्ह्यात बेडची सुविधा असणारी खाजगी हॉस्पीटलमध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखा तपासणी अधिकारी व महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात बेडसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूकजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून पर्यवेक्षकीय अधिकारी नेमणूक

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व रूग्ण संख्या पाहता बेड ची सुविधा असणारी खाजगी हॉस्पीटल कोविड-19 विषाणूबाधित रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून घेण्यात आली आहेत. या हॉस्पीटलमध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखा तपासणी अधिकारी व महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे.

खाजगी हॉस्पीटलमध्ये कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी बेड तात्काळ उपलब्ध होण्यासाठी व शासन निर्णयानुसार योग्य कार्यवाही होण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली, दुधनकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली व मेहता हॉस्पिटल सांगली या रूग्णालयांसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, भारती हॉस्पीटल सांगली, कुल्लोळी हॉस्पिटल सांगली व मिरज चेस्ट सेंटर मिरज साठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) विवेक आगवणे, शासकीय मेडीकल कॉलेज कोविड हॉस्पिटल मिरज, वानलेस हॉस्पीटल, सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व वानलेस हॉस्पिटल प्रायव्हेट साठी तहसिलदार (संगायो) किशोर घाटगे, श्‍वास हॉस्पीटल, सिव्हील हॉस्पीटल सांगली, विवेकानंद मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल बामणोली कुपवाड मिरज व अपेक्स केअर हॉस्पीटल साठी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे (भूसंपादन) यांची पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

या अधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त काम करावयाचे असून त्यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना घेऊन रूग्णांचा प्रवेश व डिस्चार्ज याबाबतीत पर्यवेक्षण करणे, बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अद्ययावत करून घेणे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक रूग्णांना फायदा करून देणे तसेच रूग्णालयांचे प्रशासन व इतर शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवणे व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामकाज करावयाचे आदेश दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली