शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus :सांगली जिल्ह्यात ६१ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:12 IST

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी ६१ ने वाढ झाली, तर वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ५८ वर्षीय पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहरात शुक्रवारी २३, तर महापालिका क्षेत्रात ३४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील १३ जण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात ६१ जणांना कोरोनाची लागणकामेरीच्या पोलिसाचा मृत्यू : बाधितांची संख्या ९०० पार

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी ६१ ने वाढ झाली, तर वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ५८ वर्षीय पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहरात शुक्रवारी २३, तर महापालिका क्षेत्रात ३४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील १३ जण कोरोनामुक्त झाले.कामेरी येथे ११ जुलैरोजी भिवंडीहून आलेल्या ५८ वर्षीय पोलिसास मिरजेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सांगलीत एकाच दिवशी २३ नवे रुग्ण आढळले आहेत. यात हरिपूर रोडवरील काळी वाट परिसरात कर्नाटकातून उपचारासाठी आलेल्या रुग्णामुळे एकाच कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कलानगर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी दोन, तर अरिहंत कॉलनी, चांदणी चौक, अभयनगर, भारती हॉस्पिटल, गणेशनगर, वानलेसवाडी, खणभाग व हरिपूर रोड येथील प्रत्येकी एकाला कोरोना झाला आहे.

मिरज शहरात अकराजणांना कोरोनाचे निदान झाले आहे. यात नदीवेस परिसरातील कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबातील तिघेजण, तसेच कमानवेस व रमा उद्यान येथील खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यालाही लागण झाली आहे. शहरासह तालुक्यातील गुंडेवाडी, अंकली, बिसूर येथे प्रत्येकी एकास, तर कवलापूर येथे आणखी दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे.

जत तालुक्यात शुक्रवारी नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. यामध्ये जत, उमदी, निगडी खुर्द, धावडवाडी येथील प्रत्येकी दोन, तर कोंत्येवबोबलाद व गुलगुंजनाळ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. निगडी खुर्द येथील रुग्ण हैदराबादहून, तर धावडवाडी येथील रुग्ण पुण्याहून आला आहे. कोंत्येवबोबलाद येथील ४५ वर्षीय खासगी डॉक्टर व गुलगुंजनाळ येथील बाधित रुग्णाच्या ३४ वर्षीय नातेवाईकाचा यात समावेश आहे. उमदी येथील बाधितांमध्ये खासगी डॉक्टरसह टेलरिंग व्यावसायिकाचा समावेश आहे.

वाळवा तालुक्यात कामेरी येथील दोन पोलिसांना, साखराळे आणि पेठ हद्दीतील अभियंतानगर आणि आष्टा येथील पाचजणांना कोरोनाचे निदान झाले आहे. साखराळे येथील ६० वर्षीय महिला सुरत येथून १६ जुलैला आली होती. पेठ हद्दीतील अभियंतानगरमध्ये २७ वर्षीय तरुण ३० जूनला पुणे येथून आला होता. कामेरी येथील रेल्वे पोलीस १० जुलैरोजी भुसावळहून आला होता.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली