कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागातील कवठेपिरान आणि नांद्रे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या माेहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य विशाल चाैगुले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कसबे डिग्रज, कवठेपिरान, दुधगाव, नांद्रे, मौजे डिग्रज आदी गावांतील २८० आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, दुधगावच्या जिल्हा परिषद सदस्या सुरेखा आडमुठे, वैद्यकीय अधिकारी युवराज मगदूम, ए. एस. गुरव, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : ०८ कसबे डिग्रज १
ओळ : मिरज पश्चिम भागातील आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले