जिल्ह्यातील ९ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, आटपाडी २, जत, कवठेमहांकाळ, पलूस, मिरज तालुका, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआरअंतर्गत ४८९७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३२६ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७३३१ जणांच्या नमुने तपासणीतून २६२ जण बाधित आढळले.
उपचार घेत असलेल्या ४९१६ जणांपैकी ६६५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५४८ जण ऑक्सिजनवर, तर ११७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू, तर नवीन १४ जण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १८८२०३
उपचार घेत असलेले ४९१६
कोरोनामुक्त झालेले १७८३३३
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४९५४
शनिवारी दिवसभरात
सांगली ६६
मिरज ६
आटपाडी ३१
कडेगाव ३४
खानापूर २७
पलूस १६
तासगाव १०६
जत १०४
कवठेमहांकाळ ४६
मिरज तालुका ७०
शिराळा २
वाळवा ६४