सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून, सोमवारी ५२६ जणांना कोरोनाचे निदान झाले. पाच महिन्यांत प्रथमच एकाचदिवशी सहाजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधितांच्या संख्येने ५६ हजारांची संख्या पार केली असून, २७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोेज वाढच होत आहे. महापालिका क्षेत्रासह वाळवा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. सोमवारी दिवसात सांगली, जत तालुक्यातील प्रत्येकी दोघांसह खानापूर, वाळवा तालुक्यातील सहाजणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांत वाढ होत आहे. सध्या ४०४९ जण उपचार घेत असून, त्यातील ६१९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५४७ जण ऑक्सिजनवर, तर ७२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सध्या २९२७ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
चाैकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५६०८०
उपचार घेत असलेले ४०४९
कोरोनामुक्त झालेले ५०१७९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८५२
सोमवारी दिवसभरात
सांगली ४७
मिरज २७
वाळवा ७६
तासगाव ६०
खानापूर ५७
कडेगाव ५१
शिराळा ४५
जत ४३
मिरज तालुका ३९
कवठेमहांकाळ ३१
आटपाडी २८
पलूस २२