शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच केली कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:24 IST

CoronaVirus Sangli : राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध कडक करीत संचारबंदी लागू केली असतानाही विटा शहरासह तालुक्यात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाने रस्त्यावरच सापडेल त्या जागीच कोरोना चाचणी करण्यात सुरूवात केली आहे. त्यासाठी प्रशासन आक्रमक झाले असून कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे विटा शहरासह संपूर्ण तालुका हादरला आहे.

ठळक मुद्देविट्यात विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच केली कोरोना चाचणीप्रशासनाची धडक मोहिम : विटा शहरासह तालुका हादरला

विटा : राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध कडक करीत संचारबंदी लागू केली असतानाही विटा शहरासह तालुक्यात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाने रस्त्यावरच सापडेल त्या जागीच कोरोना चाचणी करण्यात सुरूवात केली आहे. त्यासाठी प्रशासन आक्रमक झाले असून कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे विटा शहरासह संपूर्ण तालुका हादरला आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने दि. १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजलेपासून संचारबंदी लागू केली आहे. सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाने हाहाकार उडाला असून रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.विटा शहरासह तालुक्यात रूग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरीक विना मास्कचे शहरात फिरत आहेत. गुरूवारी पहिल्या दिवशीच विटा शहरात संचारबंदीचा फज्जा उडाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा शुक्रवारी खडबडून जागी झाली आहे. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, पोलीस उपअधिक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल नलवडे यांच्यासह पथकाने शुक्रवारी विटा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात येऊन कारवाईचा बडगा उगारला.यावेळी या पथकाने विनामास्क व विनाकारण रस्त्यावरून फिरणाºया लोकांची चौकशी केली. त्यावेळी त्यातील अनेकांची तातडीने कोरोनाची सक्तीने अ‍ॅन्टीजन चाचणी घेतली. तर काही दुचाकीस्वारांच्या दुचाकी जप्त केल्या. यावेळी संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण मुक्त संचार करणाºयांवरही कारवाई केली. त्यामुळे अनेक नागरीकांचे चांगलेच धाबे दणाणले.या पथकाने पुन्हा तेथून नागेवाडी येथे जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी तेथेही काही नागरीक विनामास्क फिरताना आढळून आले. त्यांचीही या पथकाने सक्तीने कोरोना चाचणी घेतली. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रूग्णांना विटा येथील कोवीड रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या पथकाची कारवाई पाहून अनेकांनी घरातच राहण्याचे पसंत केले.विटा शहरासह खानापूर तालुक्यात संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण मोकाट फिरणाºयांवर प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी विनामास्क फिरणाऱ्या अनेकांची रस्त्यातच अ‍ॅन्टीजन चाचणी घेतली असून त्यात पॉझिटिव्ह अहवाल आल्यास त्याला कोवीड रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नागेवाडी येथे होम आयशोलेशन असलेल्या रूग्णांच्या घरीही भेटी देऊन त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने पोलीसांच्या मदतीने ही मोहीम सुरू केली असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली