शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल सुविधांचा फ्लॉप शो

By admin | Updated: March 28, 2016 00:19 IST

इस्लामपुरातील योजना : ५० टक्क्यांहून अधिक घरे वापराविना

अशोक पाटील -- इस्लामपूर इस्लामपूर शहरातील बेघरांना घरे मिळावीत यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन अद्ययावत घरकुल योजना अंमलात आणली. बांधलेल्या घरकुलांच्या इमारती बाहेरील बाजूने पाहिले असता मुंबई शहराची आठवण होते. परंतु येथे राहणाऱ्यांना पालिकेने मूलभूत सुविधा पुरविलेल्या नाहीत. त्यामुळे येथील ५० टक्क्याहून अधिक घरे वापराविना पडून आहेत. तर महादेवनगर परिसरातील घरकुलांची अवस्था दयनीय झाली आहे. एकूणच घरकुलांच्या सुविधांचा फ्लॉप शो ठरत आहे.प्रारंभीच्या टप्प्यात पालिकेने महादेवनगर परिसरात दारिद्र्य रेषेखालील लोकांना घरे देण्यासाठी घरकुल योजना राबवली. या योजनेतील सर्व घरांचे वाटप झाले आहे. परंतु यातील बहुतांशी कुटुंबे राहण्यासच आलेली नाहीत. तर काहींनी आपली घरकुले अवैधरित्या भाड्याने दिली आहेत. याच ठिकाणी बांधलेल्या भाजी मार्केटची अवस्था दयनीय असून, ते वापराविना पडून आहे. काही घरामध्ये जुगाराचा व्यवसाय सुरु असल्याचे समजते.दुसऱ्या टप्प्यात अद्ययावत अशा १६ इमारती उभ्या करण्यात आल्या. एका इमारतीमध्ये २६९ स्क्वेअर फुटाचे २४ घरकुल आहेत. अशी एकूण ३८४ घरकुले बांधून तयार आहेत. त्यापैकी २४0 घरांचे वाटप झाले आहे. या कुटुंबाने प्रारंभीच्या टप्प्यात १५ हजार रुपये भरले आहेत. तर लाईट व पाण्यासाठी ११ हजार रुपये भरण्यात आले आहेत. पाण्याची सुविधा झाली असली तरी अद्याप लाईट व्यवस्था नसल्याने येथील अनेक घरकुले वापराविना पडून आहेत. तर काहींनी घरकुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अवैधरित्या लाईट घेतली आहे.शहरातील दारिद्र्यरेषेखालील लोकांचा फेरसर्व्हे करणे गरजेचे आहे. ज्यांना या घरकुलामध्ये घरे मिळाली आहेत, ते दारिद्र्यरेषेखालीच नाहीत. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्यांनाही या घरकुलात घरे देण्यात आली आहेत. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणेकरुन खरोखरच जे बेघर आहेत अशांना घरे मिळतील.