शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी वादावादी, राजकीय पक्षासह व्यवसायिकांचा विरोध

By शीतल पाटील | Updated: August 28, 2023 18:08 IST

शंभरफुटी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सांगली : शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज मार्गावरील (शंभर फुटी रस्ता) अतिक्रमणावर सोमवारी महापालिकेने हातोडा टाकला. अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी दहापासून फलक हटविण्याची मोहीम सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. या रस्त्यावरील अनेक फलक पथकाने जमीनदोस्त केले. यावेळी फलक हटविताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पण महापालिका पथकाने विरोध झुगारून कारवाई सुरूच ठेवली. त्यामुळे शंभरफुटी रस्त्याने मोकळा श्वास घेतला.महापालिकेवर प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेण्याचे आदेश दिले होते. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त वैभव साबळे यांनी फलक, होर्डिंग्ज काढून घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत सोमवारी संपली. सकाळी दहा वाजता उपायुक्त साबळे अतिक्रमण पथकासह शंभरफुटी रस्त्यावर उतरले. पहिल्या टप्प्यात पादचारी मार्ग मोकळे करण्यात आले. रस्त्यावर बांधकाम करून उभारण्यात आलेले फलक मोडून काढण्यात आले. दोन जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य ठेवल्याने त्यांच्या दंडात्मक कारवाई झाली. रस्त्यावरील फलक उखडून टाकण्यात आले. भाजीपाला संघटनेचे नेते शंभोराज काटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शंभरफुटी रस्ता शेवटपर्यंत अतिक्रमण मुक्त करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेवटपर्यंत ही कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. उपायुक्त साबळे यांच्यासह अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे, सहायक आयुक्त सचिन सागावकर, सहदेव काकडे यांच्यासह पथकाचा कारवाईत समावेश होता.

टॅग्स :Sangliसांगली