शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

वाळवा पंचायत समितीत वादंग

By admin | Updated: September 18, 2015 23:34 IST

सभागृह नामकरणाचा प्रश्न : काँग्रेस सदस्यांचा सभात्याग

इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीच्या नवीन इमारतीमधील सभागृहाला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव देण्यावरुन आज सभागृहात सत्तारुढ राष्ट्रवादी आणि काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार वादंग झाले. मात्र सभापती रवींद्र बर्डे यांनी, सहा महिन्यांपूर्वीच हा नामकरणाचा ठराव मंजूर झाला आहे, त्यामुळे त्यावर आता चर्चा होणार नाही, असा पवित्रा घेतल्याने, काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग करीत नव्या इमारतीमधील बाकड्यांवर ठाण मांडले.पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमधील वसंतदादा सभागृहात शुक्रवारी सभापती रवींद्र बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. या सभेत नामकरणाच्या विषयावरुन प्रचंड गोंधळ माजला. सत्तारुढ राष्ट्रवादी आणि काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दीक चकमकी उडाल्या. सत्तारुढ गटाने, हा ठराव सहा महिन्यांपूर्वी झाला आहे, तसेच हा विषय आजच्या सभेच्या विषयपत्रिकेवर नाही, अशी भूमिका घेत काँग्रेसच्या सदस्यांची मुस्कटदाबी केली. त्यामुळे संतप्त काँग्रेस सदस्यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत सभात्याग केला.काँग्रेसच्या प्रकाश पाटील यांनी, पंचायत समितीच्या संपूर्ण नव्या इमारतीला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव द्या, त्याला आमची हरकत नाही. मात्र पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे नाव का नको, याबाबतची भूमिका सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावी, अशी मागणी केली. त्यांच्या वक्तव्यात सत्तारुढ गटाच्या सदस्यांनी जोरदार अडथळे आणल्यामुळे काहीकाळ गोंधळ माजला.पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील क्रांतिकारक, समाजसुधारकांची परंपरा लक्षात घेऊन लोकनेते राजारामबापूंसह वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, पट्ठे बापूराव, अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर बर्डे गुरुजी, क्रांतिवीर पांडू मास्तर यांची नावे इमारतीमधील प्रत्येक विभागाला द्या. त्यांच्या या मागणीला काँग्रेसच्या अजित भांबुरे, प्राजक्ता देशमुख, राजश्री माळी या सदस्यांनी पाठिंबा देत, पाटील यांच्यासह सभात्याग केला.दरम्यान, सभापती रवींद्र बर्डे म्हणाले, नव्या इमारतीमधील सभागृहाच्या नामकरणाचा ठराव सहा महिन्यांपूर्वी मंजूर झाला आहे. वसंतदादांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यावर आता चर्चा करता येणार नाही. इमारतीमधील प्रत्येक विभागाला नावे देण्याची पध्दत नाही. विरोधकांना बसण्यासाठी विश्रामगृहासह माझे चेंबर, अँटी चेंबर सदैव खुले आहे. तरीही त्यांना स्वतंत्र व्यवस्था हवी असेल, तर तिसऱ्या मजल्यावर उपलब्ध करुन देऊ. (वार्ताहर)कक्षाबाहेरच्या बाकड्यावर ठाण मांडलेपं. स. सभागृहाच्या नामकरणावरुन आज काँग्रेसचे सदस्य अत्यंत आक्रमक झाले होते. सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळणार नाही हे स्पष्ट होताच, त्यांनी सभात्याग करीत नव्या इमारतीमधील सभापतींच्या कक्षाबाहेरील बाकड्यांवर ठाण मांडले. तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नजीर वलांडकर यांनी तेथे जाऊन काँग्रेस सदस्यांची भेट घेतली. नामकरणाबाबत काँग्रेस सदस्यांची भूमिका योग्य असल्याने संपूर्ण काँग्रेस पक्षाची ताकद तुमच्या पाठीशी आहे, असे वलांडकर यांनी सदस्यांना सांगितले.