शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमदी पोलिसांचा कारभार वादात

By admin | Updated: June 17, 2016 00:28 IST

दोन घटनांनी खळबळ : पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्याचा कु टुंबियांकडून आरोप

 गजानन पाटील --संख -जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कारणाने जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाणे चर्चेत राहिले आहे. या महिन्यात संशयितांनी केलेली आत्महत्या, संख पोलिस चौकीत एक संशयास्पद झालेला मृत्यू, या दोन घटनांनी खळबळ उडाली आहे. या दोन घटनांमध्ये मृतांच्या नातेवाईकांनी घातपाताचा, पोलिस मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप केलेला आहे. या दोन घटनांचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. या घटनेने उमदी पोलिस ठाण्याचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ठाण्याचा कारभार सुधारण्याचे खडतर आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. जत पूर्व भागातील अहमदनगर-विजापूर महामार्गावर उमदी पोलिस ठाणे आहे. पोलिस ठाण्याअंतर्गत ५२ गावांचा समावेश आहे. संख व माडग्याळ या पोलिस चौक्या आहेत. एकूण लोकसंख्या १ लाख ८० हजार ६३० इतकी आहे. कर्नाटक सीमेलगत हे पोलिस ठाणे आहे. सीमेलगत चालणारे अवैध धंदे, खून, मारामारी, तस्करी यांचा क्राईम रेट सर्वात जास्त आहे.चंदन, गांजा, वाळू, दारू हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिस ठाण्यातील हद्दीचा वापर केला जातो. खून, मारामारी, अपहरण यासारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. या पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्याची नेमणूक ही शिक्षा मानली जाते. पण येथे आलेला कर्मचारी परत दुसरीकडे जाण्यासाठी तयार होत नाही, हा इतिहास आहे. पोलिस ठाण्याअंतर्गत करेवाडी (को. बोबलाद), करेवाडी (तिकोंडी), जाडरबोबलाद, पांढरेवाडी, सोन्याळ, उटगी, आसंगी तुर्क, उमदी, सनमडी ही गावे संवेदनशील आहेत.१२ मे रोजी अंकलगी (ता. जत) येथील लालसाब ऊर्फ इनूस गुडुसाब अपराध (वय ४०) यांचा संख येथील पोलिस चौकीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. मृत लालसाब अपराध यांची पत्नी बैतुला अपराध यांनी, सतत होणाऱ्या मारहाणीस कंटाळून पतीच्या विरोधात उमदी पोलिसात चार दिवसांपूर्वी लेखी तक्रार अर्ज दिला होता. यावरुन पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी गुरुवारी दुपारी संख पोलिस चौकीत बोलावले होते. दरम्यान, लालसाब यांचा मृत्यू झाला होता. पत्नी बैतुला यांनी, पोलिस मारहाणीतच मृत्यू झाला, अशी तक्रार केली. इनकॅ मेरा शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्यात आला.मात्र राजकुमारने आत्महत्या केलेल्या शौचालयाची उंची कमी आहे. तेथे रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याइतपत जागा नाही. आत्महत्या केल्यानंतर नातेवाईकांना उशिरा त्याची माहिती देण्यात आली. पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही बसविलेले असतानाही संशयित आरोपीने शौचालयात जाऊन आत्महत्या केली. रात्री उशिरापर्यंत ही घटना कशी कळली नाही? यामुळे एकूणच कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आसंगी येथील कौटुंबिक वादातील तक्रारीवरुन पोलिसांनी एका युवकाचे मुंडण केले होते. या प्रकरणातही पोलिसांचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडलेला होता.महिन्याभरातच घडलेल्या दोन घटनांनी पोलिसांची अब्रू गेलेली आहे. आता पोलिसांच्या समुपदेशनाची गरज आहे. चांगला पारदर्शी कारभार करुन लोकांचा विश्वास मिळविण्याचे खडतर आव्हान पोलिसांसमोर आहे. आत्महत्या : पोलिस ठाण्यात७ जून रोजी गुलगुंजनाळ (ता. जत) येथे गंगुबाई अवगोंड नंदगोंड यांच्या झालेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपी राजकुमार गुंडाप्पा नंदगोंड ( घुमकनाळ, जि. विजापूर) यांनी उमदी पोलिस ठाण्याच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुलगुंजनाळ येथील जंगलात गंगुबाई नंदगोंड या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यामध्ये संशयित म्हणून राजकुमार व सासरा गुंडाप्पा या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी राजकुमारने आत्महत्या केलेली होती, मात्र वडिलांनी पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.आरोपींचे कोठडीतून पलायन२२ मार्च २००५ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याला हादरवून सोडणारी एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळल्याची घटना घडली होती. त्यामध्येही संशयित म्हणून उमदी पोलिस ठाण्यातील १ पोलिस होता. ६ फेब्रुवारी २००६ रोजी पोलिस कोठडीतून ३ आरोपींनी पलायन केले होते.