कामेरी : कामेरी परिसराच्या विकासात जगदीश पाटील यांचे मोठे योगदान आहे. पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी शंभर टनापेक्षा जास्त उत्पन्न घेण्यासाठी केलेले मार्गदर्शन सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
कामेरी (ता. वाळवा) येथे कृषिभूषण जगदीश शामराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मान्यवरांनी जगदीश पाटील यांना अभिवादन केले.
या वेळी भीमराव पाटील, देवराज पाटील, रणजित पाटील, उदय पाटील, पृथ्वीराज पाटील, सुनील पाटील, विक्रम पाटील, संग्राम पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच योगेश पाटील, डाॅ. रणजित पाटील, डॉ. प्रकाश पाटील, तानाजी माने, धनाजी पाटील, बंडाकाका पाटील, दि. बा. पाटील, छगन पाटील, विलास माने, शहाजी पाटील, अशोक कुंभार आदी उपस्थित होते.
रणजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रवींद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दि. बा. पाटील यांनी आभार मानले.