लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सेवादल हा काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. आजवरच्या पक्षवाढीमध्ये या शिस्तबद्ध दलाचे योगदान मोठे आहे, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी व्यक्त केले.
येथील काँग्रेस भवनात सेवादलाच्या नवीन कार्यकारिणी निवडीसाठी बैठक पार पडली. यावेळी विक्रम सावंत, जितेश कदम, अण्णासाहेब कोरे, सदाशिव खाडे, अजित ढाेले उपस्थित होते. सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलासराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी झाल्या. नव्या कार्यकारिणीमध्ये सेवादल जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक पाटील, पैगंबर शेख, शमशुद्दीन गडीकर, दिनकर बाबर, जिल्हा संघटकपदी अनिल भिंगे, शिवाजी कनप, अल्लाबक्ष मुल्ला, सुनील पाटील, सदाशिव ढगे, सुभाष पाटील यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्षांमध्ये कडेगावसाठी विजय नांगरे, जतला मोहन माने, आटपाडीसाठी दिलीप साळुंखे, मिरजेला राजाराम खोत, पलुसला सुशांत जाधव, वाळव्यासाठी दत्तात्रय गावडे, इस्लामपूर शहराध्यक्षपदी इसाक हवालदार, विटा शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटील यांच्या निवडी करण्यात आल्या.