शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी आरोग्यसेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा; रिक्त पदावर सेवेत कायम घेण्याची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: May 17, 2023 18:24 IST

कंत्राटी आरोग्यसेविका दहा ते पंधरा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर रुग्णांना सेवा देत आहेत.

सांगली : कंत्राटी आरोग्यसेविका दहा ते पंधरा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर रुग्णांना सेवा देत आहेत. या सेविकांना जिल्ह्यातील रिक्त पदावर कायम सेवेत घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी कंत्राटी नर्सेस युनियन संलग्न आयटकच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. प्रवेशद्वारातच आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

आंदोलनात अध्यक्षा शीतल नागराळे, सचिव सुमन देशमुख, सहसचिव स्वाती साले, उपाध्यक्षा हेमलता राजशिरके, संगीता कांबळे, कार्याध्यक्षा मनीषा साळुंखे, सहकोषाध्यक्षा नीता थोरात, मंगल करे, संघटक रूपाली पाटील आदींसह आरोग्यसेविका मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत्या. आंदोलकांनी जिल्हा परिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कंत्राटी आरोग्यसेविका गेल्या १६ वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. 

कोरोना काळात जिवावर उदार होऊन काम करत त्यांनी लाखो लोकांचे प्राण वाचविले आहेत. विधानसभेवर अनेकदा मोर्चे काढून आपल्या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. तरीही शासन मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दि. २० जून २०२२ रोजी एक आदेश देऊन आरोग्य खात्यात काम करणाऱ्या कंत्राटी आरोग्यसेविकांना सेवेत कायम करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही सरकार या आदेशाचे उल्लंघन करत आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व कंत्राटी आरोग्यसेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. समायोजनाचा प्रस्ताव शासन आदेशानंतरचकंत्राटी शहरी आणि ग्रामीण आरोग्यसेविकांना जिल्ह्यातील रिक्त पदावर समायोजन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने आणि सहानुभूतीपूर्वक पाठवावा, अशी मागणी आरोग्यसेविकांनी अधिकाऱ्यांकडे केली. यावर अधिकाऱ्यांनी आपले निवेदन पाठविण्यात येईल. पण, प्रस्ताव शासनाकडून पत्र आल्यानंतरच पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

टॅग्स :Sangliसांगली