शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या ठेकेदाराची रोकड, मोटार, रिव्हॉल्व्हर पळवले

By admin | Updated: October 2, 2016 01:09 IST

पेठ येथील घटना : वाघवाडीतील गोदामात कोंडून मारहाण

इस्लामपूर : सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम ठेकेदाराला शहरातील वाघवाडी रस्त्यावरील प्रतीक पेट्रोलपंपाच्या भांडार खोलीत कोंडून त्याच्याकडील एक लाख रुपयांची रोकड, मोबाईल, कार आणि परवाना असलेले रिव्हॉल्व्हर, १२ जिवंत काडतुसे काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१६ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी ठेकेदाराने पेठ (ता. वाळवा) येथील १७ जणांविरुद्ध खंडणी व मारहाणीची फिर्याद सोलापूर पोलिसात दिली. सोलापूर पोलिसांनी तपासासाठी हा गुन्हा इस्लामपूर पोलिसांकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी किशोर बारडोले पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणारे ठेकेदार आहेत. घटनेतील मुख्य संशयित अर्जुन पाटील व बारडोले यांच्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी नळपाणी पुरवठा योजनेचे काम करण्याबाबत लेखी करार झाला होता. बारडोले यांनी बांधकाम करुनही त्यांना त्याचे पैसे न देता संशयितांनी त्यांना प्रतीक पेट्रोलपंपाच्या भांडार खोलीत कोंडून घालून टाक्यांचे बांधकाम का करत नाहीस? असे म्हणून बेदम मारहाण केली. कमरेच्या बेल्टने गळा आवळून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच बारडोले यांच्याकडील परवान्याचे रिव्हॉल्व्हर, १२ जिवंत काडतुसे, मोबाईल, कार, कराराची कागदपत्रे व एक लाख रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर नोटरी करुन घेऊन बारडोले यांना सोडून दिले. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर करीत आहेत. (वार्ताहर) मारहाण, खंडणी, लुटीचा गुन्हा याबाबत बांधकाम ठेकेदार किशोर मच्छिंद्र बारडोले (वय ४८, रा. वाणी गल्ली, बार्शी रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्जुन सखाराम पाटील, अतुल पाटील, अशोक पाटील, लहु गुरव, लिपिक गायकवाड (सर्व रा. पेठ, ता. वाळवा) यांच्यासह इतर ८ ते १२ साथीदारांविरुद्ध बेकायदेशीरपणे कोंडून ठेवून मारहाण करणे, खंडणी व लुबाडणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.