शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

लॉकडाऊन काळातही अखंड ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

इस्लामपूर : सध्या कोविड-१९ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरोना विषाणूचा जगभर होत असलेला प्रसार संपूर्ण जगासमाेर आव्हानात्मक बनला आहे. ही ...

इस्लामपूर : सध्या कोविड-१९ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरोना विषाणूचा जगभर होत असलेला प्रसार संपूर्ण जगासमाेर आव्हानात्मक बनला आहे. ही एकप्रकारे सार्वजनिक आरोग्य व शैक्षणिक आणीबाणीच असून आपल्या समाजासाठीही एक संकट आहे. भारतासह जगभरातील बहुसंख्य देश त्याचा मोठ्या धैर्याने मुकाबला करत आहेत. जगभरातील बहुसंख्य व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत आहे. परंतु या जागतिक संकटाचा शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा व्यत्यय येत आहे.

कोरानामुळे जगभरातील शिक्षण व्यवस्था आज संकटात आहे. परंतु या संकटाने आपोआपच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची आणि ते विकसित करण्याची एक चांगली संधी शिक्षण क्षेत्रासाठी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन शिक्षण आणि अध्यापन यासाठीची ही संधी शिक्षणाची भावी दिशा बदलू शकते हे अधोरेखित झाले. या काळात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शिक्षणाची गती वाढण्यास मदत झाली. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी राजारामनगर, इस्लामपूर, सांगली या महाविद्यालयालाही 'कोविड १९' च्या संकटाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी व विद्यार्थी तसेच कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शैक्षणिक कामकाज बंद ठेवावे लागले. याचा मोठा परिणाम विद्यार्थांच्या शिक्षणावर झाला. परंतु या सर्व गोष्टींचा विचार करून, विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी आरआयटीने ‘ऑनलाईन शिक्षण’ पद्धतीचा वापर करण्याचे ठरवून त्याची अत्यंत प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली.

आरआयटी हे अशा प्रकारचा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेतील किंबहुना राज्यातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे असे म्हणता येईल. यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मोठी मदत झाली आहे. आरआयटीने सुरू केलेल्या या प्रयोगाचे अनुकरण आता इतरही अनेक महाविद्यालयांनीही सुरू केले आहे.

गेले कित्येक महिने संपूर्ण जग कोविड -१९ या संसर्गजन्य विषाणूंशी सार्वजनिक व व्यक्तिगत आरोग्य, अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि मानवी मानसशास्त्र या भिन्न आघाड्यांवर मोठ्या धैर्याने लढा देत आहे. याचा सार्वत्रिक परिणाम शिक्षण व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात झाला. यातून शिक्षण व्यवस्था उद्धस्त होण्यापासून वाचवण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांनी अध्यापन व शिक्षण प्रक्रियेत अद्यावत तंत्रज्ञानाच्या साधन-सुविधांचा वापर करण्यास सुरुवात केली.

ऑनलाईन शिक्षण आणि शिकवणं जे एका विशिष्ट उद्देशापर्यंत मर्यादित होते, ते आता भारतातील शिक्षण व्यवस्थेला चालना देण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करीत आहे. या संपूर्ण काळामध्ये कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने कॅम्पसमधील नियमित शैक्षणिक कामकाजास स्थगिती देऊन शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत, काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन शिक्षणाचे पवित्र कार्य सुरूच ठेवले. गेल्या काही कालावधीपासून अल्प प्रमाणात वापरात असणारी ‘ऑनलाईन शिक्षण प्रणाली’ अत्यंत प्रभावीपणे आणि संपूर्णपणे कार्यान्वित करून ती सक्षमपणे राबिवली.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे बहुतांश शिक्षण संस्थांनी अखंडपणे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून ज्ञानार्जनाचे कार्य केले. आम्हास अभिमान आहे की, फक्त शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा प्रथम स्वीकार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे आरआयटी हे पहिले महाविद्यालय ठरले. हे ऑनलाईन शिक्षण हेतू हा, की शैक्षणिक अभिव्यक्ती वाढवणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात गुंतवून 'कोविड- १९' मुळे निर्माण झालेल्या मानसिक व भावनिक नैराश्येस बळी पडण्यापासून टाळणे आणि आम्हास हे सांगण्यास सार्थ अभिमान वाटतो की, आरआयटी यामध्ये संपूर्णपणे यशस्वी झाले.

मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. हजारो वर्षांपासून कधीही न थांबलेल्या मानवजातीच्या विकासाला खीळ बसली. उत्तरोत्तर कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगासोबत भारतामध्ये देखील वाढला. सुरुवातीला मोठ्या शहरांना ठप्प करणाऱ्या कोरोनाने अगदी दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांनाही लक्ष्य केले. या परिस्थितीचा सर्वच क्षेत्रांसोबत शिक्षण क्षेत्रासही फटका बसला. विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान लक्षात घेता सर्व शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनाने ऑनलाईन शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. विविध ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्मचा वापर करून तात्काळ ऑनलाईन तासिका सुरू केल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग करून प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला. प्रथम सत्र संपल्यानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि इतर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये ऑनलाईन तासिका घेण्यासाठी पूर्ण सुविधायुक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्मची गरज असल्याचे ठळकपणे समोर आले. यावर अंमलबजावणी म्हणून लगेचच एमएस टीम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा परवाना खरेदी करण्यात आला. सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे त्यावर खाते उघडून त्याचे तपशील देण्यात आले. एमएस टीम परवाना खात्यामुळे ऑनलाईन तासिकांमध्ये येणाऱ्या बहुतांश अडचणी दूर झाल्या. तासिकेसाठी अमर्याद सदस्यसंख्या, ऑटो अटेंडन्स डाऊनलोड, तासिका रेकॉर्ड करण्याची सुविधा ही एमएस टीमची ठळक वैशिष्ट्ये होत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट नेटवर्कमुळे अडथळा आल्यावर तासिका रेकॉर्ड करून त्याचा व्हिडीओ उपलब्ध करून दिला. विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा झाला. एमएस टीमसोबतच ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उदा. ऑडिओ माईक्स, डिजिटल राईटिंग पॅड उपलब्ध करून दिल्यामुळे प्राध्यापक वर्गास विशेष मदत झाली.

ऑनलाईन शिक्षणाचा हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही विश्वासात घेऊन समाविष्ट ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व विषद केले आणि आम्हास सांगण्यास अभिमान वाटतो की सर्वांनीच केलेल्या या सहकार्याच्या जोरावरच हे ऑनलाईन शिक्षणाचे 'शिवधनुष्य' सहजरित्या पेलले. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी म्हणून विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सनी विनाशुल्क आपली सेवा या महान शैक्षणिक कार्यास उपलब्ध करून दिली.

याचबरोबर युजीसी आणि एमएचआरडीसीने विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक आयसीटी उपक्रम देऊ केले. लाॅकडाऊनमुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा वापर करून विद्यार्थ्यांना या संसाधनांचा वापर करण्यास आणि ज्ञान वाढविण्यास प्रेरित केले. आरआयटी हे ऑनलाईन शिक्षणाचे आव्हान अत्यंत कल्पकतेने पार पाडण्यात यशस्वी झाले. यासाठी विद्यार्थ्यांचा सर्व्हेही करण्यात आला. यातून असे दिसले की, नवीन पिढीला फेसबुक, व्हाट्स ॲप, इंस्टाग्राम, यू ट्यूब यासह सोशल मीडिया चॅटिंग आणि इंटरनेटमध्ये व्यस्त राहण्यास आवडते. या सर्वांमधून त्यांना त्यांच्या शिक्षणाकडे वळविणे हेच एक मोठे आव्हान होते आणि आम्ही ते पेलले हे सांगण्यात सार्थ अभिमान वाटतो. ही ऑनलाईन शिक्षणाची भूमिका अत्यंत कल्पकतेने पार पाडण्यात आम्ही यशस्वी झालो.

परंतु या सर्वांमधून एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली की, विद्यार्थी इतर मनोरंजक व्हिडीओऐवजी ऑनलाईन लेक्चर्स रेकॉर्ड करण्यास प्राधान्य देऊ लागले. ते इंटरनेटच्या माध्यमातून सराव टेस्ट्स शोधण्याचा प्रयत्न करायला लागले. हे सर्व करत असताना काही शंका उपस्थित झाल्या तेव्हा इंटरनेट, व्हॉट्‌स ॲपच्या माध्यमातून शिक्षकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ लागले. तसेच शिक्षकांनी त्यांच्या विषयांशी संबंधित मशीन ऑपरेशन्स, लॅबोरेटरी प्रॅक्टिकल्सचे व्हिडीओ तयार करून ते मूडल सॉफ्टवेअरद्वारे विद्यार्थ्यांपर्यन्त पोहोचविले. म्हणजेच फक्त ऑनलाईन लेक्चर्च न घेता ऑनलाईन प्रॅक्टिकल्ससुद्धा यशस्वीरित्या करून घेतली. या अनोख्या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इंजिनिरिंगसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिके महत्त्वाची भूमिका बजावतात. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके कशी शिकवावीत, हा खूप मोठा प्रश्न होता. त्यासाठी विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये उपस्थित असणे अनिवार्य असते. परंतु व्यवस्थापनाने हे आव्हान स्वीकारले व प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकेसुद्धा ऑनलाईन पद्धतीने घ्यायचे ठरवले. त्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक विषयाच्या प्रात्यक्षिकासाठी प्राध्यापकांचे गट तयार केले. प्रत्येक गटाने दिलेल्या विषयातील प्रात्यक्षिके सर्वप्रथम स्वत: करून पाहिली. त्यानंतर प्रात्यक्षिकामागील सिद्धांत, प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या उपकरणांची मांडणी, प्रात्यक्षिक सुरू असताना वेगवेगळ्या तांत्रिक मापदंडांचे वाचन व त्याची नोंद, नोंदीवरून निकाल आणि निष्कर्ष काढणे या विषयांवर प्रत्येक प्रयोगासाठी सविस्तर व्हिडीओ बनवण्यात आले. प्रात्यक्षिके प्रभावीपणे आत्मसात करण्यासाठी प्रत्येक वर्ग तुकड्यांमध्ये विभागण्यात आले. प्रत्येक तुकडीचे प्रात्यक्षिकासाठी ऑनलाईन वेळापत्रक बनविण्यात आले. प्रत्येक प्रात्यक्षिक सत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचे महत्त्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे समजावून सांगितले. त्यानंतर बनविलेले व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच त्यावेळी विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्राध्यापकांनी प्रात्यक्षिकावेळी घेतलेल्या नोंदी विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. प्रात्यक्षिक सत्रानंतर व्हिडीओ, निरीक्षणे तसेच प्रात्यक्षिकांबद्दलची इतर माहिती विद्यार्थ्यांना मुडल या ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी ही माहिती डाउनलोड करून त्याचा अभ्यास केला आणि त्यावर अहवाल लिहिला. हा अहवाल स्कॅन करून तो पुन्हा ‘मुडल’ या प्लॅटफॉर्मवर प्राध्यापकांकडून तपासणीसाठी उपलब्ध केला. सर्व प्रात्यक्षिके पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची ऑनलाईन माध्यमातून तोंडी परीक्षा घेऊन त्याचे मूल्यमापन करण्यात आले. वरील पद्धती राबवत असताना वेळोवेळी खूप आव्हाने व अडथळे निर्माण झाले. परंतु प्राध्यापकांनी त्यांचा अभ्यास करून तसेच विचारविनिमयातून त्यातून मार्ग काढला. एकंदरीत कोविड काळातील ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवले. त्यांच्या आवडीनुसार शैक्षणिक बाबींचे नियोजन केल्यामुळे, विद्यार्थ्यांनीही अत्यंत आवडीने, न कंटाळता करमणुकीसह या कोविड काळातील ऑनलाईन शिक्षणाचा आनंद लुटला. हेच मोठे यश आहे असे आम्ही मानतो.

या सर्व गोष्टी करत असताना एक गोष्ट अत्यंत अभिमानाने सांगावीशी वाटते. कोरोनाच्या या खडतर काळातही आमचे सर्व प्राध्यापक व स्टाफने जे अविरत परिश्रम घेतले, त्याला तोड नाही. त्यांचे योगदान, कामाप्रती असणारी निष्ठा यांचा मोठा वाटा आहे असे आम्ही मानतो. काहीवेळा तर कुटुंबातील सदस्य किंवा नातलग किंवा स्वतः या आजाराशी झुंजत असतानाही त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे हे काम सुरू ठेवले, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.

या सर्व गोष्टी करत असताना एक गोष्ट अत्यंत अभिमानाने सांगावीशी वाटते. कोरोनाच्या या खडतर काळातही आमचे सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी जे अविरत परिश्रम घेतले, त्याला तोड नाही. त्यांचे योगदान, कामाप्रति असणारी निष्ठा यांचा मोठा वाटा आहे असे आम्ही मानतो. काहीवेळा तर कुटुंबातील सदस्य किंवा नातलग किंवा स्वतः या आजाराशी झुंजत असतानाही, त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे हे काम सुरू ठेवले, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. हे ऑनलाईन शिक्षणाचे कार्य सुरळीतपणे व अखंडित सुरू ठेवून विद्यार्थांना सतत कार्यरत ठेवण्यासाठी कॉलेजच्या अकॅडेमिक प्लॅनिंग टीमने अविरत कष्ट घेतले. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे सूक्ष्म नियोजन केले. त्यास तोड नाही. हे सर्वच अभिनंदनास पात्र आहेत.

—————————