शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मोदी सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:16 IST

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईला विरोध, भाजप निषेधाच्या घोषणा

शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ येथील काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. खासदारकी रद्द करून मोदी सरकारने लोकशाहीचा खून केला असल्याचा आरोप करण्यात आला. ‘मोदी हटाव, लोकशाही बचाव’, ‘लोकशाहीची हत्या करणार्या मोदी सरकार धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वक्तव्याबद्दल सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महिला आघाडीच्या शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील काँग्रेस कमिटीसमोर मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

विशाल पाटील म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. गेल्या निवडणुकीत फसव्या आश्वासनामुळे तीनशेपेक्षा जादा खासदार निवडून आले. राहुल गांधींनी लोकसभेत सरकारची पोलखोल केली आहे. त्यामुळे त्यांना अपात्र करण्याची कारवाई तातडीने झाली. लोकसभेतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र जनतेतील आवाज भाजप सरकार दाबू शकणार नाही. घाबरून माफी मागणारे माफीवीर आम्ही नसून क्रांतीकारकांची आम्ही मुले आहोत. यापुढे लढणार आणि भाजपला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, देशात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून घाणेरडे राजकारण चालू आहे. राहुल गांधी यांनी मोदी आणि अदानी संबंधाची पोलखेल केल्याने भाजप बिथरला आहे. मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांचा राग मनात धरून सूड उगवण्यासाठी प्रयत्न केला. ही कारवाई हुकूमशाही पद्धतीने केलेली आहे. ही तर मोदी अस्ताची सुरुवात आहे.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक अभिजित भोसले, तौफिक शिकलगार, प्रकाश मुळके, माजी नगरसेवक करीम मिस्त्री, रवींद्र वळवडे, संजय कांबळे, मालन मोहिते, सनी धोतरे, महावीर पाटील, डी.डी.चौगुले, भाऊसाहेब पवार, अजित ढोले, आदिनाथ मगदूम, पी.एल.राजपूत, मौला वंटमोरे, अल्ताफ पेंढारी, आशिष चौधरी, आशिष कोरी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी