शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

कॉंग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचे श्राद्ध : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:41 IST

 नोटाबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली. येत्या ८ नोव्हेंबरला या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याने कॉंग्रेस यादिवशी जुन्या नोटांचे श्राद्ध घालून शासनाच्या कृतीचा निषेध करेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देनोटाबंदीच्या निर्णयाला १ वर्ष पूर्ण कर्जमाफी , विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात भेदआकडेवारीतील तफावत , राष्ट्रियकृत बँकेची चौकशी करा!

सांगली ,दि. १ :  नोटाबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली. येत्या ८ नोव्हेंबरला या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याने कॉंग्रेस यादिवशी जुन्या नोटांचे श्राद्ध घालून शासनाच्या कृतीचा निषेध करेल, अशीमाहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, नोटाबंदीनंतर देशाच्या विकासाचा दर गतीने कमी होत गेला. आघाडी सरकारच्या कालावधित असलेला ९.२ टक्क्यांचा विकास दर आता ५.७ टक्क्यांवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते तो खरे तर २ टक्क्यांवर आहे.भाजपमधीलच काही नेते आता नोटाबंदीमुळे सरकारची फसगत झाल्याचे कबुल करीत आहेत. तरीही पंतप्रधान ही गोष्ट कबुल करायला तयार नाहीत.

तज्ज्ञांच्या मतानुसार देशातील काळा पैसा हा जमिनी, बोगस कंपन्या आणि विदेशी बँका यामाध्यमातून अडकलेला आहे. रोखीच्या स्वरुपातील काळा पैसा हा अत्यंत नगण्य होता. तरीही सरकारने देशाचे ८६ टक्के चलन रद्द करून नवे आणले. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारा हा निर्णय आहे. ८ नोव्हेंबर रोजी आम्ही जुन्या नोटांचे श्राद्ध घालून शासनाचा निषेध करू.

सरकारविरोधात कुणी काही बोलले की त्यांच्या घरावर छापे टाकले जातात, खोट्या बातम्या जाणीपूर्वक पेरल्या जातात. एका नेत्यावर कारवाई झाली की बाकीचे दहशतीखाली येतील, असा विचार या कारवाईमागे असतो. त्यामुळे अत्यंत वाईट राजकारण महाराष्ट्रात व देशात भाजपच्या माध्यमातून सुरू झाले आहे.

त्यांच्या या राजकारणाला आता जनताच योग्य धडा शिकवेल. त्याची सुरुवात ग्रामपंचायत निवडणुकीतून सुरू झाली आहे. कर्जमाफीच्या माध्यमातूनही सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यायचे सोडून त्यांच्या सहनशीलतेशी खेळण्याचाप्रयत्न केला. अजूनही प्रक्रियेतील गोंधळ संपलेला नाही. आघाडीच्या काळातील कर्जमाफीत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजप सरकार जाणीवपूर्वक उपस्थित करीत आहेत. आमच्या काळात असे चुकीचे पैसे कोणाला दिले असतील तर सरकारने चौकशी करून संबंधितांवर जरूर कारवाई करावी, असे ते म्हणाले.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात भेदशासनाने कर्जमाफीचा निर्णय घेताना, त्याचे निकष ठरविताना विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असा भेद केला. वास्तविक शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी असा भेद त्यांनी करायला नको होता, असे चव्हाण म्हणाले.

राष्ट्रियकृत बँकेची चौकशी करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी एका राष्ट्रियकृत बँकेच्या आकडेवारीतील तफावतीची कबुली दिली. या बँकेने कर्जमाफीसाठी लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुरुवातीला ६ लाख ५0 हजार सांगितली होती. काही दिवसातच या बँकेने हा आकडा दीड लाखावर आणला. इतकी मोठी तफावत एका राष्ट्रियकृत बँकेच्या आकडेवारीत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. केंद्रीय अर्थमंत्री, अर्थखाते तसेच राज्य शासनाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

कर्ज वाढवायला कुणी सांगितले ?

आमच्या आघाडी सरकारच्या शेवटच्या वर्षात राज्यावरील कर्ज २ लाख ७0 हजार कोटीचे होते. त्यावेळी आमच्यावर याच भाजप नेत्यांनी टीका केली होती. त्यावेळी मी त्यांना यातील एक रुपया कर्ज कमी करून दाखविण्याचे आव्हानदिले होते. प्रत्यक्षात या सरकारने हे कर्ज आता ४ लाख १२ हजार कोटींवर गेले आहे. एलबीटी रद्दचा निर्णय घेऊन शासनाने ३७ हजार कोटींचे नुकसान ओढवून घेतले. अनावश्यक बुलेट ट्रेनचा भार तिजोरीवर वाढवून घेतला. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण