शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज भाजपमध्ये

By admin | Updated: May 29, 2017 23:01 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज भाजपमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या गळ्यात कमळ चिन्हाचा मफलर देऊन त्यांना प्रवेश देण्यात आला. कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर येथे भाजपच्या मेळाव्यात त्यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, आमदार महेंद्र लांडगे, प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, नीता केळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, डॉ. दिलीप येळगावकर, विनायक पावसकर, स्वप्निल भिंगारदेवे, रामकृष्ण वेताळ, दीपक पवार, जगदीश जगताप उपस्थित होते.‘स्वाभिमानी’कडून काळे झेंडेशेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमुक्ती दिली जात नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येत आहे. कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रा काढली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांना भेटायला गेलेला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही कर्जमुक्तीबाबत निर्णय घेतले जात नाही. याचा निषेध करीत मलकापूर येथे कृष्णा हॉस्पिटलसमोर सोमवारी, दुपारी दीड वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. यांचा पक्षप्रवेशमलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबा गावडे, माजी नगराध्यक्षा शारदा खिलारे यांच्यासह नगरसेविका यमुना घाडगे, वनिता लाखे, कऱ्हाड दक्षिण काँगे्रसचे प्रवक्ते मोहनराव जाधव, खटाव येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार यांच्यासह नवल थोरात, अधिक घाडगे, सुधीर पवार, दिलीप चव्हाण, सुनीता धायगुडे, दत्ताभाऊ सावंत. राष्ट्रवादीचे माजी उपजिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील यांच्यासह राजू पठाण, अमोल पाटील यांनी प्रवेश केला. महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह नगरसेवक कुमार शिंदे, श्रद्धा रोकडे, सुनीता आखाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.