शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नेत्यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:14 IST

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनीच पोलिस कोठडीत खून करून त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळल्याच्या प्रकरणात गृहखात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, पोलिसांनी सुपारी घेऊन ही हत्या केल्याचा संशय ...

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनीच पोलिस कोठडीत खून करून त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळल्याच्या प्रकरणात गृहखात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, पोलिसांनी सुपारी घेऊन ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला.राज्यातील गृहखाते एकीकडे एका गरीब तरुणाच्या हत्येची सुपारी घेते, तर दुसरीकडे अपहरणाची तक्रार असूनही शिवसेनेच्या एका आमदाराला अभय देते. यातूनच सरकारचे खरे रूप समोर येत आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.ते म्हणाले की, मुंबईत काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आ. प्रकाश सुर्वे यांच्यावर एका तरुणाने अपहरणाची तक्रार केली होती. सत्तेतील घटकपक्षाचा आमदार म्हणून गृहखात्याने या प्रकरणात आलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. धनदांडग्या लोकांना एकीकडे गृहखाते अभय देत असतानाच, सांगलीत एका गरीब युवकाचा कोठडीत खून करण्यात येतो, ही बाब दुर्दैवी आहे. पोलिस आता सुपारी घेऊन काम करू लागल्याचे चित्रही राज्याने पाहिले आहे. अशा गोष्टींना आता राज्य शासनाने लगाम घालायला हवा.सुपारी घेऊन एन्काऊंटरचा संशय : पृथ्वीराज चव्हाणअनिकेत कोथळेचा कोठडीत केलेला खून आहे की सुपारी घेऊन पोलिसांनी केलेला एन्काऊंटर आहे, याविषयीची शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे पाहावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. चव्हाण यांनी सोमवारी सकाळी आमदार डॉ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. याप्रकरणी राज्य व केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे चव्हाण यांनी कोथळे कुटुंबीयांना सांगितले.थोडी जरी चाड असेल, तर मुख्यमंत्र्यांनी लवकर यावे!एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री मौन बाळगून आहेत. पालकमंत्र्यांनाही या प्रकरणाकडे पाहावेसे वाटत नाही. त्यांना वेळसुद्धा नाही. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना आता थोडी जरी चाड असेल, तर त्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.नोकरी देऊ : कदमअनिकेतच्या नातेवाईकांनी त्याच्या पत्नीला नोकरी देण्याबाबत गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सांगितले. परंतु नोकरी देता येणार नाही, असे केसरकरांनी सांगितले. शासन काय करते ते पाहू, अन्यथा अनिकेतच्या पत्नीला आम्ही नोकरी देऊ, असे आश्वासन आ. पतंगराव कदम यांनी दिले.

टॅग्स :Crimeगुन्हा