शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

Patangrao Kadam Funeral : पतंगराव कदम अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 19:33 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी निधन झाले.

सांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक आ. पतंगराव कदम यांच्यावर शनिवारी वांगी (ता. कडेगाव) येथे शासकीय इतमामात, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र तसेच देशातील काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांबरोबरच कार्यकर्ते, समर्थक आणि सोनहिरा खोऱ्यातील लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत पतंगरावांना अखेरचा निरोप देण्यात आला.

मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री पतंगरावांचे निधन झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी पुणे येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी चार वाजता सोनसळ येथे त्यांच्या जन्मगावी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. यावेळीही या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वांगी येथे सोनहिरा साखर कारखाना ते कडेगाव रस्त्यावरील अंत्यविधीच्या ठिकाणी आणण्यात आले.  सायंकाळी ५.४५ वाजता पतंगरावांचे पुत्र विश्वजित कदम यांनी मुखाग्नी दिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपपसभापती माणिकराव ठाकरे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री आ. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, विजयसिंह मोहिते पाटील, खा. संजयकाका पाटील, खा. उदयनराजे भोसले, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुमनताई पाटील, आ. अनिल बाबर, आ. विलासराव जगताप, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभूराज देसाई, शेकापचे आ. जयंत पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रा. एन. डी. पाटील, विनय कोरे, पतंगरावांचे कुटुंबीय यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमcongressकाँग्रेस