शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

काँग्रेस-भाजपत रस्ते कामावरून जुंपली... सांगली संजयनगरातील प्रकार : शासन व महापालिकेचाही निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:31 IST

सांगली : संजयनगर येथील एका रस्त्याच्या कामावरून काँग्रेस व भाजपत वाद रंगला आहे. हा रस्ता महापालिकेच्या निधीतून मंजूर केला आहे. शिवाय शासन निधीतही रस्त्याचे काम

ठळक मुद्देया रस्त्याचे दलित वस्ती सुधार योजनेतून महापालिकेमार्फत जिल्हा नियोजन समितीने हे काम मंंजूरया कामाचा गुरुवारी महापालिकेने प्रारंभ केला. यातून चांगलाच वाद रंगला

सांगली : संजयनगर येथील एका रस्त्याच्या कामावरून काँग्रेस व भाजपत वाद रंगला आहे. हा रस्ता महापालिकेच्या निधीतून मंजूर केला आहे. शिवाय शासन निधीतही रस्त्याचे काम आहे. काँग्रेसने या रस्त्याच्या कामाचा गुरूवारी नारळ फोडला असून, त्याला भाजपने विरोध केला आहे. काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, तर भाजपने महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

महापालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेने मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २४ कोटीचा निधी मंजूर केला आहे. यातून सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरातील ३२ रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, तर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष प्रयत्न करून ३३ कोटीचा निधी आणला आहे. आ. गाडगीळ यांच्या कामासाठी दीड वर्षापूर्वी महापालिकेने ना हरकत दाखले दिले होते. त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांनी शासन निधीतील कामांचा समावेश करण्यात आल्याचे सांगत प्रशासनाने त्यांच्या प्रभागातील अनेक कामे रद्द केली होती.

दरम्यान, महापालिका व शासन निधी यातील कामांचा घोळ अद्याप मिटलेला दिसत नाही. संजयनगर येथील बसस्थानक ते सहारा चौक हा रस्ता महापालिकेच्या दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर करण्यात आला. त्यासाठी १७ लाख रुपयांची निविदा काढली आहे. हाच रस्ता आ. गाडगीळ यांच्या शासन निधीतही समाविष्ट आहे. त्यामुळे संजयनगरमधील काँग्रेस व भाजप समर्थकांत रस्त्यांच्या कामाचा श्रेयवाद उफाळून आला आहे.या रस्त्याचे दलित वस्ती सुधार योजनेतून महापालिकेमार्फत जिल्हा नियोजन समितीने हे काम मंंजूर केले आहे. या कामाचा गुरुवारी महापालिकेने प्रारंभ केला. यातून चांगलाच वाद रंगला. हे काम जिल्हाधिकाºयांच्या मान्यतेने झाले आहे. दलित वस्ती सुधार योजनेतील हा निधी अन्यत्र खर्च करता येत नाही. त्यासाठी शासन निधीतून या रस्त्यासाठीचा निधी अन्यत्र खर्च करावा, अशी मागणी काँग्रेसचे युवानेते संजय कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक माने यांनी हे काम थांबवावे, अशी मागणी करीत आयुक्तांना साकडे घातले. दलित वस्ती सुधार योजनेतून हे काम मंजूर असले तरी, महापालिकेने वर्कआॅर्डर न घेता हे काम सुरू कसे केले? असा जाब त्यांनी विचारला. हे बेकायदेशीर काम रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली.रस्तेकाम उद्घाटन : लगीनघाई सुरू...आ. गाडगीळ यांनी शासनाकडून मंजूर करून आणलेल्या ३३ कोटीतील कामांचे उद्््घाटन करण्यास सुरूवात केली आहे. संजयनगर येथे शुक्रवारी या रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे. तत्पूर्वीच काँग्रेसने या रस्त्याच्या कामाचा नारळ फोडला.

स्थायी समितीचे सभापती बसवेश्वर सातपुते, माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेवक मनगू आबा सरगर यांच्या उपस्थितीत कामाला सुरूवात करण्यात आली. कामाच्या ठिकाणी फलकही लावला. ही बाब भाजप समर्थकांच्या लक्षात येताच त्यांनीही या रस्त्यावर फलक लावला आहे. तसेच शुक्रवारी खा. संजयकाका पाटील, आ. गाडगीळ यांच्या उपस्थितीत उद््घाटन घेण्याचा निश्चय केला आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने काँग्रेस व भाजपमध्ये विकास कामांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.