प्रताप महाडिक ल्ल कडेगाव कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस-भाजपमध्ये काट्याची टक्कर होत आहे. काही प्रभागात प्रबळ अपक्ष उमेदवारांचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. येथील चार जागांवर शिवसेनाही ताकद अजमावत आहे. कडेगाव येथे १७ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिग्ांणात आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग १ मध्ये काँग्रेसचे मनोजकुमार मिसाळ विरुध्द भाजपचे कुलदीप दोडके असा चुरशीचा सामना होत आहे. अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव असलेल्या प्रभाग २ मध्ये काँग्रेसच्या वर्षा आबासाहेब घाडगे, भाजपच्या शांता विनोद घाडगे, तसेच शिवसेनेच्या विद्या खाडे असा तिरंगी सामना रंगणार आहे. सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग ३ मध्ये भाजपच्या अश्विनी रामचंद्र वेल्हाळ विरुद्ध काँग्रेसच्या संगीता राजेंद्र थोरात यांच्यात दुरंगी लढत होत आहे. सर्वसाधारण खुला असलेल्या प्रभाग ४ मध्ये सागरेश्वर सूतगिरणीचे माजी अध्यक्ष गुलाम पाटील यांचे चिरंजीव साजिद पाटील, भाजपचे मुख्तार पटेल, अपक्ष युनूस पटेल अशी तिरंगी लढत आहे. सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग ५ मध्ये काँग्रेसच्या संगीता राजेंद्र राऊत, भाजपच्या विमल विलास धर्मे आणि शिवसेनेच्या छाया मोहिते यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग ६ मध्ये काँग्रेसच्या कोमल रास्कर विरुध्द भाजपच्या सिंधुताई रास्कर यांच्यात दुरंगी सामना होत आहे. सर्वसाधारण खुला असलेल्या प्रभाग ७ मध्ये भाजपचे युवा नेते उदयकुमार देशमुख, काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुरेश देशमुख ऊर्फ दुबेनाना, शिवसेनेचे सुनील मोहिते अशी तिरंगी लढत आहे. सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग ८ मध्ये काँग्रेसच्या सुवर्णा हणमंतराव जाधव आणि भाजपच्या अनिता महेश देशमुखे यांच्यात चुरशीची लढत आहे. ओबीसी महिलांसाठी राखीव प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचे अविनाश जाधव यांच्या पत्नी आकांक्षा जाधव, भाजपच्या शोभाताई राजाराम जाधव आणि अपक्ष प्रमिला प्रमोद जाधव यांच्यात तिरंगी लढत आहे. ओबीसी प्रवर्गासाठी राखीव प्रभाग १० मध्ये भाजपचे शिवाजी मोहिते, काँग्रेसचे सुनील पवार आणि अपक्ष प्रमोद जाधव, अपक्ष रवींद्र जाधव यांच्यात चौरंगी लढत आहे. ओबीसी महिलांसाठी राखीव प्रभाग ११ मध्ये, काँग्रेसच्या रिझवाना हैदर मुल्ला, भाजपच्या नसिमा हमीद मुल्ला आणि अपक्ष सुनीता दीक्षित यांच्यात तिरंगी सामना होत आहे. सर्वसाधारण महिलांसाठी राखीव प्रभाग १२ मध्ये भाजपच्या उज्ज्वला आनंदराव शिंदे, काँग्रेसच्या नीता देसाई यांच्यात दुरंगी सामना होत आहे. सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग १३ मध्ये काँग्रेसच्या संगीता जाधव विरुध्द भाजपच्या दीपा चव्हाण यांच्यात चुरशीची दुरंगी लढाई रंगली आहे. सर्वसाधारण खुला असलेल्या प्रभाग १४ मध्ये काँग्रेसचे दिनकर जाधव विरुध्द भाजपचे सूरज कोळी यांच्यात दुरंगी लढत आहे. सर्वसाधारण खुला असलेल्या प्रभाग १५ मध्ये काँग्रेसचे सागर सूर्यवंशी, भाजपचे प्रतापसिंह जाधव आणि अपक्ष अजित कोळी यांच्यात तिरंगी लढत आहे. या प्रभागात अजित कोळी यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दावा केला होता, परंतु उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. ओबीसी प्रवर्गासाठी राखीव प्रभाग १६ मध्ये काँग्रेसचे माजी सरपंच प्रशांत ऊर्फ राजू जाधव, भाजपचे समशेरखान कडेगावकर, शिवसेनेचे राहुल चन्ने, अपक्ष कमलाकर चौगुले यांच्यात चौरंगी लढत आहे. येथे काँग्रेसचे चौगुले यांची बंडखोरी आहे. सर्वसाधारण खुला असलेल्या प्रभाग १७ मध्ये काँग्रेसचे माजी सरपंच विजय शिंदे, भाजपचे नितीन शिंदे आणि अपक्ष अशोक शिंदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. कदम, देशमुखांच्या प्रतिष्ठेची लढाई काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. पृथ्वीराज देशमुख या परस्परविरोधी राजकीय नेत्यांसाठी नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. यामुळे सत्ता मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
कडेगावात काँग्रेस-भाजपत काट्याची टक्कर
By admin | Updated: November 14, 2016 00:22 IST