शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक फोडाफोडीला काँग्रेस आघाडीकडून वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:25 IST

सांगली महापालिकेच्या सत्तेची चावी हाती ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपची धावपळ सुरू असताना, आता विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देनगरसेवक फोडाफोडीला काँग्रेस आघाडीकडून वेगमहापौर, उपमहापौर निवडीत भरला चांगलाच रंग

सांगली : महापालिकेच्या सत्तेची चावी हाती ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपची धावपळ सुरू असताना, आता विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सध्या भाजपमध्ये असलेले पूर्वाश्रमीच्या आघाडीच्या नेत्यांची मदत घेतली जात आहे. भाजपमधील नाराजांशी संपर्कही साधला जात असून, त्यांना विविध आमिषेही दाखविली जात आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडीत चांगलाच रंग भरला आहे.महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजपने सर्वच नगरसेवकांना गोव्याच्या सहलीवर पाठविले आहे, तर काँग्रेस आघाडीचे नगरसेवक सांगली-मिरजेतच आहेत. भाजपकडे ४३, तर आघाडीकडे ३५ नगरसेवक आहेत.

महापौर, उपमहापौर पदावरून भाजपमध्ये नाराजी उफाळून आली आहे. त्याचाच फायदा उचलण्यासाठी विरोधी आघाडीने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचे नगरसेवक गोव्यात असले तरी, त्यातील काहींशी दूरध्वनीवरून संपर्कही साधला जात आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकांची फोडाफोडी करण्याच्या हालचालींना बुधवारी चांगलाच वेग आला होता.विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह काही प्रमुख नगरसेवकांनी भाजपचे सदस्य गळाला लावण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

भाजपच्या दहा नगरसेवकांना निवडीवेळी गैरहजर ठेवण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ३३ वर येईल आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचा महापौर, उपमहापौर होईल, असे आडाखेही बांधले जात आहेत. पण दहा नगरसेवकांची जुळणी होणार का? यावर बरेच गणित अवलंबून आहे.भाजपमध्ये निम्म्याहून अधिक नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. त्यापैकी काहीजणांशी संपर्कही झाला आहे. भविष्यात पक्षांतरबंदी कायद्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासह पुढच्या निवडणुकीत उमेदवारीचा शब्द दिला आहे.

काहीजणांशी आर्थिक तडजोडही सुरू आहे. या साऱ्या घडामोडींवर भाजप नेत्यांचे लक्ष आहे. एकही नगरसेवक फुटणार नाही, यासाठी भाजपचे नेते सतर्क आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आल्याने या निवडीत रंगत आली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली