शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लिंगायत समाज मोर्चाची तयारी पूर्ण : सांगलीत रॅली--काँग्रेस, जनसुराज्य, मनसे, राष्ट्रवादी वीज कामगार संघटनेचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:24 IST

सांगली : लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता द्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय लिंंगायत समन्वय समितीच्यावतीने येत्या ३ डिसेंबरला सांगलीत काढण्यात येणाºया मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात

सांगली : लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता द्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय लिंंगायत समन्वय समितीच्यावतीने येत्या ३ डिसेंबरला सांगलीत काढण्यात येणाºया मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मोर्चात सुमारे पाच लाखाहून अधिक लिंंगायत समाजबांधव सहभागी होतील, असा विश्वास समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सकाळी शहरातून रॅली काढण्यात आली. दरम्यान, काँग्रेस, जनसुराज्य व मनसेने या मोर्चास पाठिंबा दिला आहे.समन्वय समितीचे विश्वनाथ मिरजकर, रवींद्र केंपवाडे, सिंंहासने, संजू पट्टणशेट्टी, प्रदीप वाले, डी. के. चौगुले, अशोक पाटील यांनी मोर्चाच्या नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच अन्य जिल्ह्यांसह कर्नाटकातून लिंंगायत समाजबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत. आपल्या न्याय्य हक्कासाठी लिंंगायत समाज प्रथमच रस्त्यावर उतरत आहे. हा मोर्चा अभूतपूर्व असणार आहे. लिंंगायत समाजातील विविध ४८ संघटना सहभागी होणार आहेत. समाजाचे ५० ते ६० जगद्गुरु सहभागी होणार आहेत. मोर्चात सहभागी बांधवांसाठी लिंंगायत डॉक्टरांनी नाष्ट्याची सोय केली आहे. केमिस्ट पथक स्वयंसेवकांचे काम करणार आहे. सर्व समाजाने पाठिंबा दिल्याने हा मोर्चा सर्वात मोठ्या संख्येचा असेल. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त, रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे.रविवार दि. ३ डिसेंबरला सकाळी अकरा वाजता विश्रामबाग चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. याचठिकाणी जगद्गुरु मार्गदर्शन करणार आहेत. समाजाच्या मागण्या काय आहेत, याबद्दल यावेळी तीन मुलींची भाषणे होणार आहेत. त्यानंतर घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. तब्बल १०२ वर्षांचे राष्टÑसंत डॉ. शिवलिंंग शिवाचार्य स्वामीजी या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.दरम्यान, राष्ट्रवादी वीज कामगार काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष जे. जे. पाटील, कार्यकारी अध्यक्ष एम. एस. शरीकमसलत, किरण कोकणे, लियाकत मुरसल, शिवाजी जाधव, फरिद्दिन उगारे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी लिंगायत महामोर्चा समन्वय समितीला शुक्रवारी पाठिंबा जाहीर केला. जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम तसेच महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन शिंदे यांनीही पाठिंबा दिला. यावेळी अनिल पुजारी, सुनील बंडगर, उदय कदम, नितीन पाटील, मदन तांबडे, विशाल कोळेकर, दीपक कलगुटगी, अमोल सातपुते, उदय कांबळे, दीपक कांबळे, अ‍ॅड. स्वाती शिंदे, अमर पडळकर, आदित्य पटवर्धन उपस्थित होते.पार्किंगची स्वतंत्र व्यवस्थामोर्चात सहभागी होणाºया समाजबांधवांसाठी वाहन पार्किंग व्यवस्था केली आहे. कर्नाटक, मिरजेकडून येणाºया वाहनांसाठी संजय भोकरे कॉलेज, चिंतामण, विलिंग्डन व वालचंद महाविद्यालय, कोल्हापूरकडून येणाºया समाजबांधवांच्या वाहनांसाठी शंभरफुटी रस्ता, राजमती भवनचे क्रीडांगण येथे, तर इस्लामपूरकडून येणाºया वाहनांंसाठी आंबेडकर स्टेडियमवर आणि तासगाव, पलूसकडून येणाºया वाहनांसाठी विश्रामबाग येथील सह्याद्रीनगर, मार्केट यार्डात व्यवस्था केली आहे.शिस्त पाळावीमोर्चात सहभागी होणाºया समाजबांधवांनी शिस्त पाळावी. प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्यांचा वापर करू नये. द्रोणामधूनच खाद्यपदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे प्रदूषण होणार नाही, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.