शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांसाठी सांगली भाजपमध्ये रस्सीखेच जोरदार तयारी : बड्या नेत्यांकडूनही ताकद पणाला, इच्छुकांची संख्या वाढल्याने निर्णयाची कसरत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:29 IST

सांगली : जिल्ह्यात पुन्हा एकदा महामंडळांच्या नियुक्तीचे वारे वाहू लागले असून, इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या जुन्या-नव्या अशा दोन्ही गटातील

सांगली : जिल्ह्यात पुन्हा एकदा महामंडळांच्या नियुक्तीचे वारे वाहू लागले असून, इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या जुन्या-नव्या अशा दोन्ही गटातील इच्छुकांसाठी आमदार, खासदार आणि अन्य बड्या पदाधिकाºयांकडूनही ताकद पणाला लावली जात आहे. एखादेच महामंडळ जिल्ह्याच्या पदरात पडणार असल्याने त्यासाठी जोरदार रस्सीखेच दिसून येते.

सांगली जिल्ह्यातील भाजप नेत्यांना राज्यातील महत्त्वाच्या पदांपासून डावलले गेले आहे. एकाही नेत्याला मंत्रीपदही प्राप्त झाले नाही. भाजपमध्ये सध्या नेत्यांची मोठी गर्दी दिसत आहे. ताकदीचे लोक मिळूनही त्यांच्याकडे कोणत्याही जबाबदाºया अद्याप नाहीत. पक्षीय पदांच्या माध्यमातून दुधाची तहान ताकावर भागविण्यात आली असली तरी, घुसमट संपलेली नाही. यातूनच पुन्हा जुन्या-नव्या वादाचे ग्रहण पक्षाला लागले आहे. पक्षातील अंतर्गत संघर्ष संपविण्यासाठी राज्यस्तरीय पदांवरील नेमणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळेच महामंडळांसाठी सध्या पक्षात जोरदार फिल्डिंग लागली आहे.

महामंडळांच्या शर्यतीत माजी आमदार दिनकर पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, गोपीचंद पडळकर, अरविंद तांबवेकर, मकरंद देशपांडे यांची नावे चर्चेत आहेत. ज्यांच्याकडे पक्षाचे प्रदेशचे पद असेल त्यांच्या गळ््यात महामंडळाची माळ पडणे अडचणीचे झाले आहे. पक्षातील काही नेत्यांनी याबाबतची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. राजकीय वजन वापरून दुसरे पद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न झाला, तर पक्षांतर्गत संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो.

त्यामुळे अशा गोष्टी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर टाळण्याकडे पक्षाचा कल आहे. बहुतांश इच्छुक आ. सुधीर गाडगीळ यांच्या जवळ असतात. त्यामुळे एकाचवेळी अनेक इच्छुकांसाठी शिफारस करण्याची वेळ गाडगीळांवर आली आहे. त्यांचा स्वभावही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा असल्याने त्यांनी कोणाला न दुखावता इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.

खासदार संजयकाका पाटील यांनीही अरविंद तांबवेकर यांच्यासाठी प्रदेश कार्यकारिणीकडे ताकद पणाला लावली आहे. महामंडळावर निकटवर्तीयांची वर्णी लागावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तांबवेकर यांनी दाखविलेली ताकद व आगामी महापालिका निवडणुकीचा दाखलाही संजयकाकांनी दिला आहे. सुधीर गाडगीळांना निवडणुकीत मदत करणाºया प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये तांबवेकरांचाही समावेश आहे.

महापालिका निवडणुकीचा विचार केला तर संजयकाकांबरोबरच माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, नीता केळकर आणि मकरंद देशपांडे महत्त्वाचे मानले जातात. इच्छुकांमध्ये सर्वाधिक इच्छुक महापालिका क्षेत्राशी संबंधित आहेत. नीता केळकर यांच्याकडे प्रदेशचे उपाध्यक्षपद तसेच स्थानिक समित्यांमधील पदेही आहेत. मकरंद देशपांडे यांच्याकडे सध्या विभागीय संघटकपद आहे. मोठे पद नसलेल्या इच्छुकांमध्ये दिनकर पाटील, शेखर इनामदार आणि अरविंद तांबवेकर यांचा समावेश आहे.

गोपीचंद पडळकरांची ताकदही भाजपला दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचारही या शर्यतीत केला जात आहे, मात्र विधानसभा उमेदवारीच्या शर्यतीतसुद्धा ते आहेत. त्यामुळे पक्ष त्यांना कोणत्या माध्यमातून ताकद देणार आहे, याची कल्पना स्थानिक नेत्यांनाही नाही.नेत्यांची प्रतिष्ठा : नियुक्तीच्या डावावरमहामंडळांच्या शर्यतीत उतरलेल्या इच्छुकांपेक्षा त्यांच्यासाठी धडपडणाºया नेत्यांचीच प्रतिष्ठा डावावर लागली आहे. कोणत्या नेत्याची ताकद पदांच्या शर्यतीत कामी येणार, हासुद्धा चर्चेचा विषय आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला स्थान मिळेल, अशीही शक्यता वर्तविली जात असताना, महामंडळाच्या चर्चेलाही उधाण आले आहे.