शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

कॉंग्रेसचा सांगलीत बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 3:43 PM

पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दरवाढ मागे घेतली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देजिल्हा कॉंग्रेसच्यावतीने दरवाढीचा निषेध सांगलीच्या झुलेलाल चौकातून मोर्चाशास्त्री चौकापर्यंत शासनाच्याविरोधात निदर्शनेआंदोलनकर्त्यांनी केला केंद्रीय मंत्र्यांचा निषेध

सांगली : पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारीसांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दरवाढमागे घेतली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराआंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

सांगलीच्या झुलेलाल चौकातून हा मोर्चा शास्त्री चौकापर्यंत आला. याठिकाणीकेंद्र व राज्य शासनाच्या निषोधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. एकाबैलगाडीत मोटारसायकल टाकून इंधन दरवाढीचा प्रतिकात्मक निषेध व्यक्तकरण्यात आला. ‘मोदीची आता तुमच्यावर जनतेचा भरोसा हाय का? असा सवालव्यक्त करणारे फलकही झळकविण्यात आले. झुलेलाल चौकातील एका सभागृहातमोर्चापूर्वी कॉंग्रेसची सभा पार पडली.

या सभेत कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, इंधनदरवाढीतून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सध्याराज्यात पेट्रोलचा दर ८0 रुपये, तर डिझेलचा दर ६२.३६ इतका आहे. अडिचमहिन्यात पेट्रोलदरात १६ रुपये तर डिझेल दरात ४  रुपयांनी वाढ झाली आहे.इंधन दरवाढीचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फटका सामान्य लोकांना बसत आहे.

कॉंग्रेसच्या काळात १0५ डॉलर प्रति बॅरेल क्रुड आईलचा दर असतानापेट्रोलचा दर ६0 रुपये प्रतिलिटर होता. आता भाजपच्या काळात क्रुड आॅईलचेदर ५0 डॉलर प्रति बॅरेल असताना  पेट्रोलचा दर मात्र ८0 रुपयांच्या घरातगेला आहे. इंधन दरवाढीतून सरकारला मोठे घबाड लागले आहे. सध्या पेट्रोलचादर क्रुड र्आॅईलच्या दराचा विचार करता ३५ ते ४0 रुपये प्रतिलिटर असायलाहवा होता, मात्र दर वाढतच चालले आहेत.

राज्य शासनानेही भरीस भर म्हणून या दरात आणखी वाढ केली आहे. अन्यराज्यांचा विचार केला तर दिल्लीत ७0, कोलकाताला ७३, चेन्नईला ७२,गोव्याला ६४ रुपये आणि कर्नाटकात ७१ रुपये पेट्रोल आहेत. महाराष्टÑाचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने महाराष्टÑात हाच दर ८0रुपयांच्या घरात आहे. दूध, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंच्या दरात,उद्योग व्यापाºयांवर या दरवाढीचा प्रत्यक्ष फटका पडला आहे, असे तेम्हणाले.

यावेळी नगरसेवक राजेश नाईक, शेवंता वाघमारे, पुष्पलता पाटील, मंगेशचव्हाण, करीमभाई मेस्त्री, रवी खराडे, निसार संगतरास, अल्ताफ शिकलगार,किरणराज कांबळे, पौगंबर शेख, राजन पिराळे, जावेद शेख, रावसाहेबमाणकापुरे, बी. जी. बनसोडे, आदी सहभागी झाले होते.

केंद्रीय मंत्र्यांचा निषेध

केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी इंधन दरवाढीसंदर्भात मतमांडताना या दरवाढीने सामान्य जनता उपाशी राहणार नसल्याचे वक्तव्य केलेहोते. आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी या वक्तव्याचा निषेध केला. असंवेदनशीलसरकारमधील असंवेदनशील मंत्र्यांना आवर घालण्याची मागणी करण्यात आली.⁠⁠⁠⁠