विरोधात स्थायी समिती स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक मंगळवारी गोंधळामुळे स्थगित करण्यात आली. एका आरोग्य कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीच्या विरोधात सदस्य आक्रमक असताना त्याला पदोन्नती दिल्याने सदस्य नाराज होते. याचा निषेध करत सभा स्थगित करण्यात आली.
अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या उपस्थितीत सभा होती. बुधवारी (ता. २४) दुपारी सर्वसाधारण सभा असल्याने काही महत्त्वाचे विषय चर्चेसाठी होते. सदस्यांनी एका आरोग्य सहायकाविषयी चर्चा सुरू केली. सध्या तो जिल्हा परिषदेत नियुक्तीस आहे. नेमणूक दिली आहे. गावात लोकांशी गैरवर्तणूक करतो, केंद्रात नसतो अशा तक्रारी सदस्यांनी केल्या. तरीही त्यांना जिल्हा परिषदेत का घेतले आहे? असा सवाल केला. त्यांना मूळ जागी काम करायला सांगा, अशी सूचना अध्यक्षांनी मागील बैठकीत दिली होती.
आरोग्य विभागाने सूचनेला केराची टोपली दाखवत त्यांना पदोन्नती दिली. त्यामुळे सदस्य संतापले.
कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असाल तर खपवून घेणार नाही, असे प्रमोद शेंडगे यांनी सुनावले. जोवर कर्मचाऱ्याची बदली अन्यत्र केली जात नाही तोवर काम होणार नाही, स्थायी समिती स्थगित ठेवा, अशी मागणी केली. त्यामुळे बैठक स्थगित करण्यात आली.
----------------------------