शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

टोलच्या प्रश्नात भूमिकेचा गोंधळ...

By admin | Updated: March 22, 2016 00:57 IST

आंदोलकांमध्ये संभ्रम : मंत्र्यांच्या आश्वासनानंतर काहींचा विरोध मावळला; काहींचा संताप कायम

सांगली : टोलच्या प्रश्नावरून सांगलीत पडलेली आंदोलनाची ठिणगी आता संभ्रमाच्या धगीने धुमसत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोल सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करताना सर्वसामान्य वाहनधारकांना टोलमाफी दिली जाणार असल्याची भूमिका मांडली. यावरून समितीमधील सदस्यांच्या भूमिकेचा गोंधळ रविवारी पाहावयास मिळाला. महापौरांसह काहींनी आंदोलनाची भाषा बंद केली आहे, तर विरोधी पक्षांचे पदाधिकारी तसेच यात भरडले जाणारे वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आंदोलनाबाबत ठाम आहेत. सांगली-कोल्हापूर स्त्यावरील टोल वसुलीस शासनाने हिरवा कंदिल दर्शविला आहे. यावरून सध्या सांगलीत संताप व्यक्त होत आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच, तसेच कमी अंतराच्या रस्त्याला टोल लावला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत आंदोलनाची तयारी सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनातील हवा काढून घेतली. छोट्या वाहनांना टोल माफीची भूमिका स्पष्ट केल्यामुळे आंदोलकांमध्ये फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी महापौरांनी विरोधाला विरोध म्हणून टोलप्रश्नी भूमिका स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र मोठ्या वाहनांना तसेच मालवाहतुकीला टोल बसणार असल्याने, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम सांगलीच्या बाजारपेठेवर होणार आहेत. त्यामुळे अन्य पक्षांचे पदाधिकारी व वाहतूकदार संघटनेची नाराजी टोलच्या प्रश्नावर कायम आहे. (प्रतिनिधी)चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणा...मार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय टोलला परवानगी दिली जाणार नाही. रस्त्याच्या कामांचा दर्जा त्रयस्थ विभागामार्फत तपासला जाईल. कामात त्रुटी असतील तर कारवाई केली जाईल. टोल सुरू झाला तरी एसटी व स्कूल बसेस, छोट्या चारचाकी, दुचाकी यांना टोल लागणार नाही. केवळ अवजड वाहनांकडूनच टोलची वसुली केली जाईल. नियम व करारपत्रातील सर्व गोष्टींची शहानिशा करूनच टोल वसुलीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.