शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर पालिका सभेत विकास कामावरून पुन्हा वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 13:12 IST

आजच्या सभेवेळीही सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. विकास कामावरुन आरोप करत डोक्याला काळ्या फिती बांधून विकास आघाडी-शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला.

इस्लामपूर : शहरातील ३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही त्याच्या निविदा का काढल्या जात नाहीत. कुणाच्या सांगण्यावरून ही कामे थांबवली जात आहेत. प्रशासन किती दिवस टाळाटाळ करणार असा आरोप करत डोक्याला काळ्या फिती बांधून विकास आघाडी-शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मारला. याचवेळी राष्ट्रवादी सदस्यांनी अपयशी सत्ताधाऱ्यांचा निषेधाच्या घोषणा दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.पालिका सभागृहात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत मागील तहकूब विशेष सभा झाली. यावेळी पुन्हा विषय पत्रिकेवरील कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी गोंधळाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीच्या आनंदराव मलगुंडे यांनी ३ कोटी २५ लाखांच्या कामाच्या निविदा काढा अशी मागणी केली. त्यावर बांधकाम अभियंत्यांनी त्याला होकार दिला. हाच धागा पकडत विकास आघाडीच्या विक्रम पाटील यांनी पुन्हा प्रशासनाच्या वेळकाढू धोरणावर हल्ला चढवला. गुंठेवारी, अकृषक प्रमाणपत्र आणि मालमत्ता हस्तांतरण ही कामे का बंद आहेत. नागरिकांना आम्ही काय सांगायचे. भुयारी गटार काम सुरू करण्याबाबत सरकारी वकिलांचा अभिप्राय आला का अशा प्रश्नाची सरबत्ती केली.त्यात राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभा पिठासमोर धाव घेत विषय पत्रिकेवरील विषयावर बोला. तुमचे ऐकून घ्यायला आलो नाही असा प्रतिवाद केला. यावेळी पुन्हा गदारोळाला सुरुवात झाली. सत्ताधारी सदस्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून प्रशासनाचा निषेध करत सभात्याग केला. त्याचवेळी राष्ट्रवादीने अपयशी सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने तणाव निर्माण झाला. आजच्या सभेवेळीही सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या मारलेल्या विकास आघाडी आणि शिवसेना सदस्यांनी विकास कामे सुरू करण्याची मागणी केली. तसेच कामे सुरू करण्यास विलंब करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूर