शिराळा : देशातील लोककलांच्या संवर्धनासाठी शिवाजी विद्यापीठाकडून लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाच्या साहाय्यक प्रा. डॉ. सुमन कृष्णा बुवा यांनी दिली. यावेळी मोडी विषयाचे अभ्यासक प्रा. वसंत शिंगण, नाट्य-चित्रपट लेखक अनंत खोचरे उपस्थित होते.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये आजीवन अध्ययन विभागात लोककला संवर्धनाविषयी चर्चा झाली. यामध्ये लोककला कार्यशाळांचे आयोजन करण्याचे ठरले. कार्यशाळांमधून जुन्या पिढीतील लोककलावंतांकडून नवीन पिढीला लोककलेचा वारसा लाभावा आणि लोककला जतन केल्या जाव्यात, समाजामध्ये त्यांविषयी आवड निर्माण करणे आणि लुप्त होणाऱ्या लोककलाकारांना एकत्रित करणे यावर भर देण्यात यावा, अशी चर्चा करण्यात आली.
यावेळी अण्णासाहेब डांगे कला अकादमीचे चंद्रकांत कांबळे, सचिन करमाळे, आदी उपस्थित होते.