शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सांगली जिल्हा ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: January 10, 2017 14:34 IST

माळवाडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि.१० - माळवाडी (ता. पलूस) येथील १४ वर्षाच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिचा खून करणाºया संशयितांना तातडीने अटक करावी, तसेच या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या सांगली जिल्हा ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरातून निषेध फेरी काढताना हुल्लडबाजी केल्याचा आरोप करुन शहर पोलिसांनी १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 
गेल्या आठवड्यात माळवाडीत आठवीत शिकणारी मुलगी नवीन कपडे घालण्यावरुन आईशी भांडण झाल्याने रात्री घरातून निघून गेली होती. ती रात्रभर घरी परतली नव्हती. दुसºयादिवशी तिचा गावातच पलूस-तासगाव रस्त्यावरील एका धान्य गोदामाजवळ मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन तपासणीत तिच्यावर सामूहिक अत्याचार करुन खून केल्याचे निष्पन्न झाले होते. या घटननेचे जिल्हाभर तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी बंद, निषेध मोर्चे निघाले. या पार्श्वभूमिवर मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी जिल्हा ‘बंद’ची हाक देण्यात आली होती. त्याला शहरात संमिश्र, तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यवहार सुरळीत सुरु होते. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकºयांनी सकाळी अकरा वाजता शहरातून निषेध फेरी काढून ‘बंद’चे आवाहन केले. 
राम मंदिर चौक, सिव्हिल चौक, काँग्रेस भवन, आझाद चौक, राजवाडा चौक, कापड पेठ, तानाजी चौक, कर्नाळ रस्ता, बालाजी चौक, हरभट रस्ता शिवाजी मंडई, मुख्य बसस्थानक परिसर, आंबेडकर रस्ता या मार्गावरुन निषेध फेरी काढण्यात आली. पदाधिकाºयांच्या आवाहनाला प्रतिसाद अनेक व्यापा-यांनी दुकाने बंद केली. बंदचे आवाहन करताना कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचा आरोप करुन पोलिसांनी १२ जणांना  ताब्यात घेतले. यामध्ये महिला, तरुण व तरुणींचा समावेश आहे. शहर परिसरातील माधवनगरसह अन्य गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक गावांनी घटना घडल्यानंतर निषेध म्हणून गाव बंद केले होते. त्यामुळे या गावांनी आजच्या बंदमध्ये सहभागी घेतला नाही. भिलवडी व माळवाडी ही गावेही बंदमध्ये सहभागी झाली नव्हती. बंदच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचित प्रकार नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. साध्या वेशातील पोलिस शहरात गस्त घालत होते. प्रत्येक चौकात पोलिसांचा ‘फिक्स पार्इंट’ नेमण्यात आला होता.