शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त भागात दुप्पट भरपाईसह संपूर्ण कर्जमाफी द्या : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:11 IST

आ. कदम यांनी पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या स्थितीबद्दलची छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. यावर फडणवीस यांनी, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना दिली माहिती

कडेगाव : महापुरात घरे, शेती व पशुधनाचे झालेले नुकसान लक्षात घेता, जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या दुप्पट रक्कम पूग्रस्तांना द्यावी, तसेच या भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, यासह १५ मागण्या प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.

आ. कदम यांनी पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या स्थितीबद्दलची छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. यावर फडणवीस यांनी, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

कदम यांनी शुक्रवारी मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात महापुराने झालेल्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली व पूरपरिस्थितीवरून निर्माण झालेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी केलेल्या विविध १५ मागण्यांबाबतचे निवेदन दिले.

पलूस तालुक्यात मदतकार्य करताना पाहिलेल्या स्थितीची माहिती दिली. शेती, पिके, रस्ते, दुकाने, पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनीची मातीही वाहून गेली आहे. शेतकऱ्यांनी पुरामुळे सोडून दिलेले पशुधनही वाहून गेले आहे. पूरग्रस्त नागरिकांसमोर संसार सावरण्याचे संकट आहे. २००५ च्या पूरपरिस्थितीत मदतीला धावून जाणाºया माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या पश्चात पूरग्रस्तांना धीर देताना हृदय हेलावून जात आहे, असे आमदार कदम यांनी सांगितले.मदतकार्याबद्दल आराखडाआमदार डॉ. कदम यांनी मदतकार्याबद्दल तयार केलेला आराखडा मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केला. शासनाने जाहीर केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम भरपाई म्हणून मिळावी, शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी व्हावी, शेतमजूर, व्यापाºयांना आर्थिक साहाय्य केले जावे, ज्यांच्या पशुधनाची वा घराची हानी झाली आहे, अशांना मदत मिळावी, शाळांची दुरुस्ती केली जावी व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पाठ्यपुस्तके मोफत मिळावीत, अशा विविध बाबींचा या आराखड्यात समावेश केला आहे. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरministerमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस