शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांकडून सांगली पोलिस प्रमुखांविरोधात तक्रारी, गृहमंत्र्यांकडून दखल

By अविनाश कोळी | Updated: June 7, 2023 12:59 IST

गुन्हेगारीच्या आलेख वाढल्याबद्दल चिंता.

अविनाश कोळीसांगली : भरदिवसा सराफ पेढीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेसह गेल्या काही दिवसांतील गंभीर गुन्हेगारी घटनांचा दाखला देत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही सोमवारी पोलिसप्रमुखांच्या निष्क्रियेतेचा पाढा फडणवीस यांच्यासमोर वाचला होता. भाजप नेत्यांच्या तक्रारीची गंभीर दखल फडणवीस यांनी घेतल्याने कारवाईचे संकेत मिळत आहेत.

गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जिल्ह्यात खून व दरोड्याच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भरदिवसा दरोडे पडत आहेत. लूटमार केली जात आहे. स्त्रियांवरील अत्याचार, नशेखोरीचे प्रमाणही चिंताजनक आहे. तरुण नशा करून गुन्हे करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिलायन्स ज्वेल्स या सोने-चांदीच्या दुकानात एका टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. हे शोरूम जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. या घटनेच्या काही दिवस अगोदरच कवठेपिरान, शिराळा तालुक्यातील निगडी येथे दरोडे पडले. सांगलीतील एका नगरसेवकावर खुनी हल्ला झाला. या लोकप्रतिनिधीकडे स्वतःचे शस्त्र असल्याने तो बचावला.

अनेक कॉलेज तरुण-तरुणी कॉलेजमध्ये तसेच आसपासच्या कॅफेमध्ये नशा करत आहेत. सावकारी वाढली आहे. बनावट नोटा चलनात आणल्या गेल्या, मात्र मुख्य सूत्रधारास अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुन्हेगारीने कळस गाठला असताना पोलिस अधिकारी शांत आहेत. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

फडणवीस यांच्याकडून कारवाईचे संकेततक्रारी प्राप्त होताच फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन गाडगीळ यांना दिले. येत्या काही दिवसांत पोलिस दलात फेरबदल होण्याची शक्यता आहे.यांनीही केल्या तक्रारीभाजपचे पालकमंत्री खाडे, आ. गाडगीळ यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनीही जिल्ह्यातील निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांबाबत सरकारकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस