शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पदाधिकाºयांवर नगरसेवक नाराज नेत्यांकडे तक्रारी : महापालिकेत आज बैठक; नाराजी दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:23 IST

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक स्वपक्षाच्या पदाधिकाºयांवर नाराज झाले आहेत. १५ हून अधिक नगरसेवकांनी पदाधिकाºयांच्या कारभाराबद्दल वरिष्ठ नेत्यांसमोर तक्रारींचा

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक स्वपक्षाच्या पदाधिकाºयांवर नाराज झाले आहेत. १५ हून अधिक नगरसेवकांनी पदाधिकाºयांच्या कारभाराबद्दल वरिष्ठ नेत्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला आहे. या तक्रारींची दखल काँग्रेस नेत्यांनी घेतली असून, नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत बैठक होत आहे.

महापालिकेच्या निवडणुका जून २०१८ मध्ये होणार आहेत. मात्र नगरसेवकांची बायनेमची कामे अद्याप मंजूर झाली नाहीत. आचारसंहिता साठ दिवस अगोदर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभागातील विकासकामे दोन महिन्यात मार्गी लावणे आवश्यक आहे. आयुक्तांकडून विकासकामांना मान्यता मिळत नाही. महापौर-आयुक्त वाद असल्याने महापौरांनी सूचविलेल्या कामांना आयुक्त बेदखल करतात. गटनेते नगरसेवकांची कामे करत नाहीत. यामुळे कॉँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी कॉँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. महापालिकेत कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी घडी विस्कटली आहे.

नगरसेवकांची कामे मार्गी लावण्यासाठी पदाधिकाºयांकडून कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे कॉँग्रेसच्या नेत्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना महापालिकेत बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गटनेते किशोर जामदार यांच्या कार्यालयात नगरसेवकांची बैठक होणार आहे. या बैठकीत पदाधिकारी व नगरसेवकांची शहर जिल्हाध्यक्ष आढावा बैठक घेऊन मते जाणून घेणार आहेत. त्यानंतर डॉ. कदम, जयश्रीताई पाटील हे नगरसेवकांच्या बैठका घेण्याची शक्यता आहे.कारणे अनेक; विकासकामांचा बोजवाराकाँग्रेस नगरसेवकांच्या नाराजीची अनेक कारणे आहेत. आयुक्तांसोबतच्या वादामुळे महापौरांचे ऐकले जात नाही. गटनेते, स्थायी समिती सभापतींचे आयुक्तांशी चांगले संबंध आहेत. पण ते स्वत:ची व मोजक्या नगरसेवकांचीच कामे करतात. इतर नगरसेवकांची कामे धूळ खात पडली आहेत. आयुक्त तर महापालिका मुख्यालयातच येत नाहीत. तरीही पदाधिकारी त्यांना जाब विचारत नाही. त्यामुळे विकासकामांचा बोजवारा उडाला असून, त्याचे खापर मात्र सत्ताधाºयांवर फोडले जात आहे, अशा तक्रारी नगरसेवक करीत आहेत.