शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

ड्रेनेज योजनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार-: प्रशासनाकडूनच योजनेचे वाटोळे;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 23:56 IST

सांगली : महापालिकेच्या प्रशासनाकडूनच ड्रेनेज योजनेचे वाटोळे सुरू आहे. योजनेच्या कामावर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांचे कुठलेही नियंत्रण नाही. नगररचना विभागाकडून पंपगृहाच्या जागा निश्चित केल्या जात नाहीत.

ठळक मुद्दे जीवन प्राधिकरणाकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा उद्योग

सांगली : महापालिकेच्या प्रशासनाकडूनच ड्रेनेज योजनेचे वाटोळे सुरू आहे. योजनेच्या कामावर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांचे कुठलेही नियंत्रण नाही. नगररचना विभागाकडून पंपगृहाच्या जागा निश्चित केल्या जात नाहीत. धामणी रस्त्यावरील वाहिनीसाठी मार्किंग होत नाही. सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा उद्योग सुरू आहे. याबाबत आता थेट मुख्यमंत्री व नगरविकास विभागाकडेच तक्रार करण्याचा निर्णय गुुरुवारी स्थायी समिती सभेत घेण्यात आला.

स्थायी समितीची सभा सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत ड्रेनेज योजनेचा मुद्द्यावरून पुन्हा एकदा वादळी चर्चा झाली. चार ते पाच ठिकाणी पंपगृहासाठी जागा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्याबाबत वारंवार चर्चा होऊन नगररचना विभागाचे अधिकारी पेंडसे कार्यवाही करण्यात हलगर्जीपणा करीत आहेत. धामणी रस्त्यावरील वाहिनीसाठी मार्किंगचे कामही रखडले आहे. एकूण योजनेबाबत प्रशासकीय स्तरावर सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप दिलीप पाटील, रोहिणी पाटील, प्रशांत पाटील व सदस्यांनी केला.

सभापती सातपुते म्हणाले की, ड्रेनेज योजनेच्या कामावर आयुक्तांचेच नियंत्रण राहिलेले नाही. केवळ बैठकीत आदेश दिले जातात, पण अंमलबजावणी शून्य होते. जीवन प्राधिकरण व नगररचनाचे पेंडसे यांच्यावरही आयुक्तांनी कारवाई केलेली नाही. ड्रेनेजचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. नगरसेवक, नागरिक, सामाजिक संघटना वारंवार तक्रार करूनही आयुक्तांकडून त्याची दखल घेतली नाही. या योजनेचे वाटोळे करण्यास प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे आता जीवन प्राधिकरण व पालिका अधिकाºयांविरोधात मंत्रालय, नगरविकास विभागाकडे तक्रार करणार आहोत. स्थायी समितीचा ठरावच मंत्रालयात सादर करू, असे सुनावले.

महापालिकेकडील विविध कामांच्या वार्षिक एजन्सी, ठेकेदारांना परस्परच मुदतवाढ दिली जात आहे. याबाबत मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते; पण त्यांनी अजून कायद्याचा अभ्यास सुरू आहे. शासन आदेशाची माहिती घेऊन लेखी उत्तर देऊ, असे सांगत हा विषय टाळला.सावंत यांना मूळ पदावर पाठवामहापालिकेच्या बांधकाम विभागाकडील आरेखक सतीश सावंत यांच्या कार्यपद्धतीबद्दल स्थायी सभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. वारंवार स्थायी समिती सभेला ते गैरहजर राहतात. गुरुवारच्या सभेलाही ते अनुपस्थित होते. नव्याने केलेले रस्ते विद्युत वाहिनीसाठी खुदाईबाबतचा अहवाल सावंत यांच्याकडून मागितला होता. पण तो त्यांनी दिलेला नाही. एका शौचालयाच्या बांधकामाबाबतही निर्देश देण्यात आले होते. त्याचेही काम पूर्ण केलेले नाही. त्यात सावंत हे पालिका बाहेरील वर्तुळात सदस्यांना अपशब्द वापरत असल्याची तक्रारही सदस्यांनी केली. अखेर सभापती सातपुते यांनी सावंत यांना त्यांच्या मूळ आरेखक पदावर पदावनती करण्याचे आदेश कामगार अधिकाºयांना दिले.कर्मचाºयांच्या पदोन्नतीवरून प्रशासन धारेवरबैठकीत सदस्यांनी कर्मचाºयांच्या पदोन्नतीवरूनही प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने अग्निशमन अधिकारी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यावर दिलीप पाटील यांनी प्रश्न केला. पालिकेकडील कर्मचाºयांनाच पदोन्नती देऊन त्यांच्याकडे पदभार सोपवावा, अशी मागणी केली. या विषयावरून इतर कर्मचाºयांच्या पदोन्नतीचा प्रश्न गाजला. अनेक कर्मचाºयांकडे सध्या प्रभारी पदभार आहे. पालिका कायद्यानुसार सहा महिनेच प्रभारी पदभार देता येतो. त्यानंतर मुदतवाढ दिली जाते. पण आयुक्तांनी आजअखेर एकाही अधिकारी, कर्मचाºयाला मुदतवाढ दिलेले नाही. तरीही ते अधिकारी प्रभारी म्हणून काम करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.