शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘हुतात्मा’, ‘राजारामबापू’बद्दल रिझर्व्ह बँकेकडे तक्रार

By admin | Updated: October 15, 2015 00:24 IST

राजू शेट्टी : एफआरपी कपातप्रश्नी चौकशीची मागणी; राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी

इस्लामपूर : केंद्र शासनाने ऊस उत्पादकांना एफआरपीपोटी दिलेल्या पैशातून बेकायदेशीरपणे कपात करणाऱ्या हुतात्मा व राजारामबापू या कारखान्यांसह शेतकऱ्यांच्या खात्यातून कारखान्याकडे परस्पर पैसे वर्ग करणाऱ्या बँकांची चौकशी करावी, अशी मागणी रिझर्व्ह बँकेकडे केल्याची माहिती स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत दिली. याचवेळी त्यांनी एफआरपीबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी केली.खा. शेट्टी म्हणाले की, दोन आठवड्यापूर्वी साखर कारखान्यांच्या वार्षिक सभा झाल्या. त्यामध्ये आयत्या वेळच्या विषयास एफआरपी तीन टप्प्यात देण्याचे बेकायदेशीर ठराव केले गेले. शेतकऱ्यांचे पैसे हडप करण्याचा डाव साखर कारखानदारांकडून खेळला जात आहे. त्याला सरकारची मूक संमती असल्याचे वातावरण कारखानदारांकडून तयार केले जात आहे. त्यामुळे याप्रकरणी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, एफआरपीमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही.शेट्टी म्हणाले की, केंद्राने शेतकऱ्यांना पैसे द्यायचे, या अटीवर मदत केली आहे. त्यामुळे त्यातून कारखान्यांना कपात करता येणार नाही. मात्र जबरदस्तीने संमतीपत्रे घेऊन ‘हुतात्मा’ने १०० रुपये, तर ‘राजारामबापू’ने १४७ रुपये कपात केली आहे. ही शुध्द फसवणूक आहे. यावर्षी एकरकमीच एफआरपी घेणार आहोत. सरकारने कारखानदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर त्याची किंमत चुकवावी लागेल. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यास सरकार कचरत असल्याच्या प्रश्नावर खा. शेट्टी म्हणाले की, सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेकांचे साखर कारखाने आहेत. सहकारामधील अनेकजण कारखानदारांना वाचविण्याचे काम करतात. त्यामुळेच कारवाई होत नसावी. मात्र आघाडी सरकारची जुलमी राजवट ज्या ऊस उत्पादकांनी उलथवून टाकली, त्यांच्याशी विश्वासघात केल्यास सध्याच्या राज्यकर्त्यांनाही त्याची किंमत मोजावी लागेल. खा. शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. एका हाकेसरशी लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे कोण काय म्हणते, याची चिंता आम्ही करत नाही. १६ आॅक्टोबरच्या मोर्चात एफआरपीचे तुकडे करणाऱ्यांवर कारवाई करा आणि १४ दिवसांत एकरकमी पहिली उचल द्यावी, या दोन प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांचे शेतकऱ्यांचे व्यक्तिगत अर्ज साखर संचालकांना देणार आहोत. या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावीच लगेल. साखर कारखान्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये एकरक्कमी एफआरपीची द्यावीच लगेल, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी सदाभाऊ खोत, विकास देशमुख, राहुल महाडिक, अ‍ॅड. एस. यु. संदे, अ‍ॅड. जयकुमार पोमाजे, भागवत काटकर, गणेश शेवाळे उपस्थित होते. (वार्ताहर)त्यांचा अंतर्गत प्रश्न--भाजप-सेनेतील तणावाबाबत विचारल्यावर खा. शेट्टी म्हणाले की, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यापुढे फक्त शेतकऱ्यांची वकिली ताकदीने करणार आहोत.आत काय आणि बाहेर काय!सध्याच्या राजकीय घडामोडी आणि सत्तेतील सहभागासाठी स्वाभिमानीला ताटकळत ठेवणाऱ्या सरकारचा पाठिंबा काढून घेणार काय? या प्रश्नावर खा. शेट्टी म्हणाले की, आत काय आणि बाहेर काय? विधिमंडळात आमचा एकही आमदार नाही. त्यामुळे पाठिंबा द्यायचा आणि काढून घ्यायचा प्रश्नच येत नाही. अगदी १५ आॅक्टोबरला सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद दिले तरी, १६ तारखेला मोर्चा निघणारच!कायद्याचा लाभ नाहीनिवडणुकीपूर्वी ऊसदर आंदोलनातील शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आघाडी सरकारने पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसानभरपाई असणारे गुन्हे मागे घेण्याचा कायदा केला. या सरकारने फक्त या कायद्याची मुदत वाढवली. त्याचा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना लाभ होत नाही. आमच्यावरील सर्व गुन्हे, खटले पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या नुकसानभरपाईचे आहेत. त्यामुळे त्याचा लाभ आम्हाला होणार नाही. आज जे सरकारात आहेत, ते त्यावेळी आमच्यावरील कारवाईचा निषेध करायचे. त्यांनी विशेष बाब म्हणून आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय घ्यावा.