शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त काका गार्डन द्या,  सांगली महापालिकेसमोर शाळकरी अनोखे मुलांचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 19:16 IST

आयुक्त काका गार्डन द्या, नगरसेवक काका गार्डन द्या, आम्ही कोठे खेळायचे? असे म्हणत शामरावनगरमधील शाळकरी मुलांनी सांगली महापालिकेसमोर अनोखे आंदोलन केले. या परिसरात दोन कोटी रुपये खर्चाचे उद्यान मंजूर होते. पण हा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याच्या निषेधार्थ मुलांनी आंदोलन करून नव्या उद्यानासाठी साकडे घातले.

ठळक मुद्देशामरावनगर परिसरातील शाळकरी मुलांची वेगवेगळी वेषभूषा आंदोलन करून नव्या उद्यानासाठी मुलांचे साकडे

सांगली : आयुक्त काका गार्डन द्या, नगरसेवक काका गार्डन द्या, आम्ही कोठे खेळायचे? असे म्हणत शामरावनगरमधील शाळकरी मुलांनी सांगली महापालिकेसमोर अनोखे आंदोलन केले. या परिसरात दोन कोटी रुपये खर्चाचे उद्यान मंजूर होते. पण हा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याच्या निषेधार्थ मुलांनी आंदोलन करून नव्या उद्यानासाठी साकडे घातले.

शामरावनगरमधील आॅक्सिडेशन प्लॉटच्या दहा ते बारा एकर जागेत उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी या जागेची पाहणी करून उद्यान विकसित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. पण ऐनवेळी या उद्यानाचा निधी अन्यत्र वळविण्यात आला. आता या दोन कोटीच्या निधीतून महापालिका क्षेत्रात १३ नवीन उद्याने करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

वास्तविक शामरावनगर परिसरात एकही उद्यान आहे. या भागात जवळपास ४० ते ५० हजार लोकसंख्या आहे. त्यात शामरावनगर, हनुमाननगर या भागात खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, ड्रेनेज समस्या अशा मुलभूत सुविधाही देण्यात आलेल्या नाहीत. पावसाळ्यात तर नागरिकांना चिखलातून जावे लागते. त्यात उद्यानाचा मंजूर निधीही पळविल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

त्यासाठी शाळकरी मुलांनीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर अनोखे आंदोलन करून प्रशासन व नगरसेवकांना जाग आणण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या प्रवेशद्वारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या मारून मुलांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर दळवी यांच्या नेतृत्वाखाली मुलांनी आयुक्त खेबूडकर यांना निवेदनही दिले.

वेगवेगळी वेशभूषाशामरावनगर परिसरातील शाळकरी मुलांनी आंदोलनावेळी वेगवेगळी वेषभूषाही केली होती. प्राणी, पक्षी, फुलांची वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. आयुक्त काका गार्डन द्या, नगरसेवक काका, नगरसेविका काका गार्डन द्या, आम्ही कोठू खेळू? आमची काय चूक? असे फलकही मुलांनी फडकवित उद्यानासाठी साकडे घातले.

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त