शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणापोटी खासगी रुग्णालयांकडून जीएसटी वसूल? हिशेब सादर करावा लागण्याची शक्यता 

By संतोष भिसे | Updated: January 23, 2023 11:56 IST

ही आरोग्यसेवा असल्याने सवलत मिळणार नाही.

संतोष भिसेसांगली : खासगी रुग्णालयांनी कोरोना काळात केलेल्या लसीकरणासाठी ५ टक्के जीएसटीची आकारणी वसूल केली जाण्याची चिन्हे आहेत. जीएसटी प्राधिकरणाने दिलेल्या एका निवाड्यामुळे तशी शक्यता निर्माण झाली आहे.खासगी रुग्णालयांतील लसीकरण ५ टक्के जीएसटी आकारणीला पात्र असल्याचा निवाडा आंध्र प्रदेशातील जीएसटीच्या अपिलीय प्राधिकरणाने दिला आहे. कोरोना लसीकरण हा एक कंपोझिट पुरवठा असल्याने ५ टक्के जीएसटीसाठी उत्तरदायी आहे असे निवाड्यात म्हटले आहे.तेथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लिमिटेड या वैद्यकीय संस्थेने जीएसटी आकारणीविरोधात अपिल केले होते. त्यावर प्राधिकरणाने म्हटले आहे की, लसीकरणाची प्रक्रिया लसविक्रीशी संबंधित आहे. त्यामुळे त्यावर जीएसटी भरावा लागेल. ही आरोग्यसेवा असल्याने सवलत मिळणार नाही.सन २०२१ मध्ये कोरोना लसीकरणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने १० हजार खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली होती. एका डोससाठी २५० रुपये शुल्क होते. त्यापैकी १५० रुपये डोसची किंमत होती, तर १०० रुपये सेवाशुल्क म्हणून रुग्णालयांना मिळाले. शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांत लसीसाठी झुंबड उडाल्याच्या काळात खासगी रुग्णालयांत खूपच गर्दी झाली होती.

कोरोनाची लाट ओसरल्याच्या काळात मात्र खासगी लसीकरण केंद्रे ओस पडली. त्यामुळे या रुग्णालयांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसला. लसीचे साठे पडून राहिले. काही रुग्णालयांनी लस कालबाह्य होऊ नये यासाठी शासनाला विनाशर्त व कोणताही मोबदला न घेता परत केली होती.

जीएसटी २५० रुपयांवर?लसीकरण केलेल्या खासगी रुग्णालयांना आता हिशेब सादर करावा लागण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील प्राधिकरणाच्या निवाड्यानुसार प्रत्येक लसीकरणासाठी ५ टक्के जीएसटी भरावा लागेल. अर्थात, ही आकारणी लसीच्या १५० रुपये किमतीवर असेल, की सेवाशुल्कासह २५० रुपयांवर असेल हे अस्पष्ट आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसGSTजीएसटीhospitalहॉस्पिटल