शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता, त्वरित कामे सुरू करा - पालकमंत्री खाडे

By संतोष भिसे | Updated: October 6, 2022 18:04 IST

स्थगिती असलेल्या लोकोपयोगी कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा करू

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. लोकोपयोगी कामे आचारसंहितेत अडकू नयेत यासाठी त्वरित सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले. स्थगिती असलेल्या लोकोपयोगी कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा करू असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.खाडे म्हणाले, अंगणवाड्यांना जागा नसल्यास जिल्हा परिषद शाळा, गायरान, ग्रामपंचायतीच्या व शासनाच्या मोकळ्या जागांचा विचार करावा. अंगणवाडीजवळ ओढे, नाले, कालवे, विहिरी असल्यास तेथे संरक्षण भिंती बांधाव्यात. दलित वस्त्यांसाठीचा निधी तेथेच खर्च झाला पाहिजे. लम्पीची नुकसान भरपाई आठवडाभरात शेतकऱ्यांना द्यावी. पाटबंधारे, लघुपाटबंधारेसाठीच्या भूसंपादनाच्या थकीत भरपाईचा आढावा त्वरित घ्यावा. शेतकऱ्यांना पैसे द्यावेत. जिल्ह्यातील मटका, दारू, जुगार आदी सर्व अवैध धंदे त्वरित बंद करावेत. त्यासाठी यंत्रणांनी कठोर कारवाई करावी.

मिरजेत कृष्णाघाटावरील मंदिराचे काम निधी देऊनही रखडल्याबद्दल खाडे यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाचे कौतुक केले.

महत्वाचे निर्णय दृष्टिक्षेपात...- अंगणवाडी बांधकामासाठी आठ लाखांऐवजी ११ लाख २५ हजार रुपये- २५:१५ योजनेची कामे जिल्हा परिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाममार्फत- शाळांमध्ये रोबोटिक्स लॅब उभारणार- प्राथमिक शिक्षकांची रिक्त ८०० पदे महिन्याभरात भरणार

मिरज सिव्हिलमध्ये कर्करोगावर उपचारखाडे म्हणाले, मिरज शासकीय रुग्णालयात एमआरआय यंत्रणेसाठी नियोजन समितीमधून निधी दिला जाईल. कर्करोगावरील उपचारांसाठीही आधुनिक सुविधांसाठी पाठपुरावा केला जाईल.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक