शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

सांगली, मिरज परिसरात कडकडीत बंद

By admin | Updated: June 2, 2014 01:18 IST

घटनेचा निषेध : बसेसवर दगडफेड; पोलीस मुख्यालयावर धडक, हिंदुत्ववादी संघटनेची निषेध रॅली

 सांगली : फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज यांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्ध केल्याचे पडसाद आज (रविवार) सांगली परिसरातही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या सांगली ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात दोन व बुधगाव (ता. मिरज) येथे एक अशा तीन एसटी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. शहरासह, माधवनगर, बुधगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर तणाव होता. प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपमहापौर प्रशांत मजलेकर-पाटील, नारायण कदम, शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले, हणमंत पवार, हरिदास पडळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप सुतार, अजिंक्य पाटील, अनिल शेटे, दिगंबर जाधव, नगरसेवक गौतम पवार, युवराज बावडेकर, शंभोराज काटकर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते सकाळी मारुती चौकात जमा झाले. त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत सांगली ‘बंद’ करण्याचा निर्णय घेतला. बंदसाठी त्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढली. मारुती रस्ता, हरभट रस्ता, बालाजी चौक, कापड पेठ, गणपती पेठ, पटेल चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, मुख्य बसस्थानक परिसर आदी मार्गावरून फिरुन त्यांनी ‘बंद’चे आवाहन केले. त्यानंतर रॅली पोलीस मुख्यालयावर गेली. शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांना निवेदन देण्यात आले. आमचा कायदा व सुव्यवस्थेवर विश्वास आहे. मात्र समाजात तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकावर राष्टÑद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर सावंत यांनी याप्रकरणी शुक्रवारी रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या संशयिताने हे केले आहे, त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दंगलसद्दश्य स्थिती निर्माण झाली, तर सर्वांचे फार मोठे नुकसान होते. यामुळे तुम्ही शांतता बाळगा. पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन केले. त्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून कडकडीच बंद आहे का नाही, याची पाहणी केली. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला शहरासह, माधवनगर, बुधगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळनंतर काही मोजकीच दुकाने अर्धे शटर उघडून सुरू झाली होती. एसटी व शहरी बसच्या फेर्‍यांचे प्रमाणही कमी जाणवत होते. अनेक रिक्षा थांब्यांवर रिक्षा नव्हत्या. मिरज : सोशल मीडियातून थोरपुरुषांच्या विटंबनेच्या निषेधार्थ मिरजेत हिंदुत्ववादी संघटनांतर्फे बंद पाळण्यात आला. मिरज, मालगाव व लिंगनूर येथे अज्ञातांनी एसटीवर दगडफेक करून काचा फोडल्या. मिरजेत दोन ट्रकवर दगडफेक करण्यात आली. शिवसेना, भाजप, शिवप्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत चौकात या प्रकाराचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मार्केट, हायस्कूल रोड, शनिवार पेठ, सोमवार पेठ परिसरातील व्यवहार बंद होते. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. दुपारी म्हैसाळ उड्डाण पुलावर (एमएच ४० बी. ८९३१) या जमखंडी-मिरज एसटीवर अज्ञातांनी दगडफेक करून काचा फोडल्या. लिंगनूर येथे (एमएच ४० वाय ५६६७) या मिरज-खटाव एसटीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. मालगावात (एमएच १४-०७७) या एसटीवर अज्ञातांनी दगडफेक करुन काचा फोडल्या. मिरजेत किल्ला परिसरात व शिवाजी रस्त्यावर राहमतुल्लाह हॉटेलजवळ थांबलेल्या ट्रकवर अज्ञात तरुणांनी दगडफेक करुन पलायन केले. दगडफेकीच्या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शनिवार पेठेत शाही चिनावली मशीदीतर्फे राष्ट्रपुरुषांच्या विटंबनेच्या निषेधाचा फलक लावण्यात आला होता. मशिदीच्या विश्वस्तांनी घटनेचा निषेध केला. (वार्ताहर)