शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दर घटल्याने कलिंगड उत्पादक हादरले

By admin | Updated: July 18, 2014 23:57 IST

रमजानमध्येही मंदी : मिरज पूर्व भागातील स्थिती; किलोला केवळ सात रुपये भाव

दादा खोत - सलगरे कलिंगडाचे दर सध्या गडगडले आहेत. वर्षभरात रमजान महिना कलिंगडाच्या बाजारासाठी महत्त्वाचा मानला जातो. परंतु उच्चांकी भाव मिळणाऱ्या कलिंगडाला यंदा रमजाननेही साथ दिली नाही. मंदावलेले दर अद्याप वधारले नसल्याने मिरज पूर्व भागातील कलिंगड उत्पादक घाट्यात आले आहेत. पूर्वी कलिंगडाचे उत्पादन हंगामी स्वरूपात घेतले जायचे. परंतु मेट्रो शहरांमधील बारमाही मागणी लक्षात घेता शेतकरी वर्षभर पीक घेऊ लागले आहेत. मिरज पूर्व भागात पाणी आल्याने कलिंगडाचे उत्पादन वाढले आहे. आॅक्टोबर ‘हिट’, उन्हाळ्याचे चार महिने, रमजान असा कालावधी कलिंगडाला चांगला भाव मिळवून देणारा कालावधी आहे. मात्र मागील आठ, दहा महिन्यांपासून कलिंगडाचे मुंबई बाजारामधील दर सरासरी आठ ते नऊ रुपये किलो इतकेच होते. त्यामुळे उत्पादकांना वाहतूक व इतर खर्च वगळून पाच रुपये किलोपर्यंतचाच भाव मिळत होता. हा दर सरासरी १३ ते १४ रुपये असेल तरच कलिंगडाचे पीक परवडते. कारण कलिंगडाचा एकरी उत्पादन खर्च लाख रुपयाच्या घरात जातो. रमजान महिन्यात मुंबईची बाजारपेठ कलिंगडासाठी ‘लकी’ मानली जाते. या महिन्यात कलिंगडाचा दर १५ ते १८ रुपयांपर्यंत असतो. मात्र यावेळी रमजानमध्येही हा दर सरासरी सात ते नऊ रुपये किलो इतकाच मिळत आहे. वर्षभरातील मंदावलेले दर रमजानमध्ये वधारून खर्चाचा समतोल या दराने भरून निघेल, अशी आशा उत्पादकांना होती; मात्र या आशेवरही पाणी पडले आहे. पडलेले दर सात रुपयांवरून अद्याप उठायला तयार नाहीत. त्यातच मान्सून सरींनाही सुरुवात झाल्याने उत्पादकांना मिळेल त्या दराने कलिंगडांची विक्री करणे भाग पडत आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही मागील वर्षभरात दर कमी असूनही केवळ रमजान महिन्यात चांगला दर मिळेल, या आशेने कलिंगडाच्या दोन महिन्यात लागवडी केल्या होत्या; पण सरासरी सात रुपये किलो असा दर मिळाल्याने उत्पादन खर्चाशी ताळमेळ घालणे मुश्कील होऊन बसले आहे, अशी प्रतिक्रिया कलिंगड उत्पादक उमेश होनराव यांनी व्यक्त केली.