शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोटीच्या ठेक्यासाठी नियमांच्या चिंधड्या--तासगाव पालिकेतील प्रकार : सत्ताधाºयांच्या अजब निर्णयाने स्वच्छ शहराच्या योजनेला कोलदांडा--पालिका सदस्यांची मूकसंमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:12 IST

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेतील जुन्या सत्ताधाºयांचा नऊ वर्षापूर्वीचा स्वच्छतेचा ठेका रद्द करून नव्या सत्ताधाºयांनी स्वच्छतेचा नवा डाव मांडला आहे. नियमांच्या चिंधड्या उडवित मर्जीतल्या ठेकेदारासाठी रंगविलेल्या कागदांमधून आता अस्वच्छ कारभाराची दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने घुसमट झालेल्या नागरिकांतून पालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.स्वच्छतेच्या ठेक्याच्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत ...

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेतील जुन्या सत्ताधाºयांचा नऊ वर्षापूर्वीचा स्वच्छतेचा ठेका रद्द करून नव्या सत्ताधाºयांनी स्वच्छतेचा नवा डाव मांडला आहे. नियमांच्या चिंधड्या उडवित मर्जीतल्या ठेकेदारासाठी रंगविलेल्या कागदांमधून आता अस्वच्छ कारभाराची दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने घुसमट झालेल्या नागरिकांतून पालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

स्वच्छतेच्या ठेक्याच्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत राज्यभरात नावाजलेल्या बीव्हीजी कंपनीकडे तासगाव नगरपालिकेच्या स्वच्छतेचा ठेका होता. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने तत्कालीन नगराध्यक्ष जाफर मुजावर यांच्या काळात पहिल्यांदाच २००७ मध्ये तासगाव पालिकेने स्वच्छतेचा ठेका बीव्हीजीला दिला होता. तेव्हापासून सहा महिन्यांपूर्वीपर्यंत हा ठेका बीव्हीजीकडे कायम होता. सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभाराºयांनी बीव्हीजीपेक्षा कमी दराने दाखल झालेली निविदा मंजूर केली. कागदोपत्री नियमांचे सोपस्कार पूर्ण करुन शहरातीलच राष्टÑवादीच्या एका पदाधिकाºयाला कोट्यवधी रुपयांचा ठेका देण्यात आला.

वास्तविक ठेकेदाराने कमी दराने निविदा मंजूर करुन घेऊन ठेका पदारात पाडून घेतला. त्यासाठी सत्ताधाºयांशी सेटलमेंट केले. मात्र ठेका घेताना केलेला करारनामा आणि वास्तवदर्शी चित्र यात मोठी तफावत होती. ठेका घेताना अन्य नगरपालिकेकडे एक कोटी रुपयांपर्यंत स्वच्छतेचा ठेका घेऊन काम केल्याचा अनुभवाचा दाखल जोडणे आवश्यक होते. स्वच्छतेसाठी आवश्यक घंटागाड्या, कचरा वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉली, मनुष्यबळ आदी साधनसामग्री आवश्यक होती. मात्र ठेकेदाराने जुन्या मोडकळीस आलेल्या घंटागाड्या वापरात आणल्या.

तुटपुंजे स्वच्छता कामगार कामास ठेवले. यासह अनेक वाहने नसतानादेखील हा ठेका पदारात पाडून घेतला. इतकेच नव्हे, तर ठेक्या घेतल्यानंतर, सहा महिन्यांनी नवीन घंटागाड्या खरेदी केल्या. तोपर्यंत खुलेआमपणे घंटागाड्यांशिवाय स्वच्छतेचे सोपस्कार पाडण्याचे काम सुरु होते.

करारनाम्यातील बहुतांश करार धाब्यावर बसवूनच ठेकेदाराकडून शहरातील स्वच्छतेचे काम सुरु आहे. शहरातील स्वच्छतेच्या तक्रारींबाबत नागरिकांनी नगरसेवकांना हैराण करुन सोडले. त्यानंतर विरोधी राष्टÑवादीच्या नगरसेवकांसह, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीदेखील नगराध्यक्षांकडे गाºहाणे मांडले. मात्र अद्याप स्वच्छतेच्या कार्यपध्दतीत बदल झालेला नाही. शहरातील मुख्य रस्त्यांचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी, विस्तारित भागात दुर्गंधीचे साम्राज्य आहे.नियमित स्वच्छता होत नसल्याच्या नागरिकांच्या सातत्याने तक्रारी आहेत. अनेक भागात गटारी तुंबलेल्या आहेत. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणाकडे पालिकेचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

वर्षभरापूर्वी तासगाव नगरपालिकेने हागणदारीमुक्त अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने तासगाव नगरपालिकेला एक कोटीचे बक्षीस जाहीर केले होते. यावेळी तासगाव नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण होणार आहे. केंद्र शासनाकडून देशपातळीवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. मात्र शहरातील स्वच्छतेचे डर्टी पिक्चर पाहिल्यानंतर, पालिकेचा या स्पर्धेत टिकाव लागण्याची शक्यता धूसर दिसून येत आहे.

सद्यस्थितीत शहरातील दुर्गंधी, डासांची वाढती घनता आणि त्यामुळे होणारे रोगराईचे साम्राज्य, यामुळे तासगावकर जनता हैराण झाली आहे. सत्ताधाºयांनी तडजोडीने दिलेला स्वच्छतेचा ठेका भाजपसाठी आणि पर्यायाने सत्ताधाºयांसाठी रोषाचा ठरत आहे. विकास नको, पण स्वच्छता करा, एवढीच माफक अपेक्षा व्यक्त होत असताना, सत्ताधाºयांच्या चुकीच्या निर्णयाने स्वच्छ तासगाव आता कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र आहे.राजकीय तडजोड : पडणार महागाततासगावच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला नगरपालिकेची सत्ता सोपवली. मात्र सत्ताधाºयांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका जनतेला बसत आहे. राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला स्वच्छतेचा ठेका मिळवून देण्यात, बँकेचे कर्ज मिळवून देण्यात, इतकेच नव्हे, तर वाहन खरेदीपासून ठेकेदाराच्या सर्वच प्रक्रियेत सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाचा पुढाकार होता. केवळ राजकीय सेटलमेंटमुळेच हा ठेका राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला देण्यात आल्याची चर्चा खुलेआमपणे तासगावात सुरु आहे. मात्र स्वच्छतेच्याबाबतीत अशीच परिस्थिती राहिली, तर ही तडजोड महागात पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.