शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

‘नागरी हक्क’चा पालिकेवरच निशाणा

By admin | Updated: June 3, 2015 01:01 IST

विट्यातील नागरिकांचा सवाल : शासकीय कार्यालयात न्याय मिळतो का?

दिलीप मोहिते - विटा -विटा शहरातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी गेल्या दोन-चार वर्षांपासून स्थापन केलेल्या (विना नोंदणीकृत) नागरी हक्क संघटनेने केवळ विटा नगरपरिषद व तेथील सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले आहे. नागरिकांना अन्य शासकीय कार्यालयात ‘हक्क’ मिळवून देण्याकडे संघटनेने पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही संघटना केवळ नगरपालिकेपुरतीच मर्यादित आहे का? असा सवाल विटेकर नागरिकांतून उपस्थित झाला आहे. दरम्यान, नागरी हक्क संघटनेने फक्त विटा नगरपालिकेवरच निशाणा साधल्याने ‘नागरी हक्क’ची लढाई ही राजकीय सूडभावनेतून सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरू लागली आहे.विटा शहरात गेल्या चार वर्षांपूर्वी नागरी हक्क संघटनेच्या माध्यमातून पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम सुरू आहे. गाळे वाटप प्रक्रिया, पालिका सभेतील बेकायदेशीर ठराव, यात्रा समितीच्या जागेची विक्री, पंचमुखी मंदिरापाठीमागील जागेची विक्री, विविध विकास कामे, रस्ते, वीज, पाणी, मुव्हेबल गाळे यांसह अन्य लाखो रूपयांच्या विकास कामांवर नागरी संघटनेने निशाणा साधला. माहिती अधिकाराखाली अर्ज देऊन माहिती संकलित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन, प्रसंगी उच्च न्यायालयापर्यंत धडक देण्याचे धाडस नागरी हक्क संघटनेने केले.त्यामुळे नागरी हक्क संघटनेच्या कामांचे नागरिकांतून कौतुक होऊ लागले. पण, हे कौतुक फार काळ टिकू शकणार नसल्याची परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. कारण ‘नागरी हक्क’ने विटा पालिका सोडून अन्य शासकीय कार्यालयांतील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकडे पाठ फिरवली आहे. राज्य शासनाचा वनीकरण, कृषी विभाग, तहसील कार्यालय यांसह अनेक शासकीय कार्यालयातही सर्वसामान्यांची कामे मोठ्या प्रमाणात अडकून पडली आहेत. त्यामुळे लोकांना प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मग याठिकाणची नागरिकांची कामे करून देऊन त्यांना हक्क मिळवून देण्याचे धाडस नागरी संघटना का करीत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.केवळ विटा पालिकेवरच निशाणा न साधता, नागरिकांची अन्य शासकीय कार्यालयांतील कामेही मार्गी लावून नागरिकांना तेथेही त्यांचे हक्क देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.अंकुश ठेवण्याचे काम...विटा शहरात नागरिकांना हक्क देण्यासाठी स्थापन केलेल्या नागरी हक्क संघटनेचे सुनील सुतार हे अध्यक्ष, पोपटराव जाधव उपाध्यक्ष, प्रवीण गायकवाड सचिव, तर संजय भिंगारदेवे हे सदस्य आहेत. असे चौघेजण सध्या तरी नागरी हक्क संघटनेचे काम पाहत आहेत. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पालिकेच्या अनधिकृत कारभारावर हातोडा मारण्याचे काम उत्तमरित्या करीत, शहरातील विकास कामांवर अंकुश ठेवण्याचे काम केले. हे जितके कौतुकास्पद आहे, तितकेच या संस्थापक-सदस्यांनी विटेकर नागरिकांची पालिकेतील व अन्य शासकीय कार्यालयांतील छोटी-मोठी कामे मार्गी लावून नागरिकांना त्यांचे ‘हक्क’ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.