ढालगाव : शासकीय रुग्णालये व उपकेंद्रामध्ये जाऊन ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोरोनाची मोफत लस घ्यावी, असे आवाहन कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के यांनी शनिवारी केले.
दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोरोना लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक चंद्रकांत हाक्के, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळेकर, सरपंच संगीता काटे उपस्थित होते.
विकास हाक्के म्हणाले की, कोरोनाची लस सध्या तालुक्यातील सरकारी दवाखाना व उपकेंद्रामध्ये उपलब्ध असून शासन आदेशानुसार ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी ही लस घेऊन शासनास सहकार्य करावे.
यावेळी ढोलेवाडीचे सरपंच प्रतिनिधी संजय खरात यांनीही कोविड लस घेतली. ग्रामसेविका स्वाती मस्के, शिवाजी हाक्के यांच्यासह नागरिक उपस्थित होते.